Marathi News Live Updates : माजी मंत्री पद्माकर वळवी काँग्रेसच्या वाटेवर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 29 september 2024 : आज रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Nandurbar News:  माजी मंत्री पद्माकर वळवी काँग्रेसच्या वाटेवर

आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपा आलेले माजी मंत्री पद्माकर वळवी पुन्हा पक्ष बदलण्याची शक्यता आहे. पद्माकर वडवी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु एखादी पक्षाने मला तिकीट दिल तर मी त्या पक्षातून निवडणूक लढणार संकेत पद्माकर वळवी यांनी दिले आहेत. मला चांगली संधी मिळाली तर ते संधीच्या मी फायदा घेणार, पद्माकर वळवी पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता,गेल्या अनेक दिवसापासून पद्माकर वळवी हे मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधात वक्तव्य करत आहेत परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शहादा तळोदा मतदारसंघ किंवा अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातून लढण्याची इच्छा पद्माकर वळवी यांनी व्यक्त केली आहे.

Beed News: भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के बंडखोरीच्या तयारीत, बीडमध्ये महायुतीत ठिणगी ?

भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र मस्के आगामी विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पक्षाने तिकीट देऊ किंवा न देऊ निवडणूक लढवणार असे म्हणत राजेंद्र मस्के हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.. बीडमध्ये आयोजित मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.. आमचा गाडा विधानसभेच्या शर्यतीत उतरणार आहे. फक्त बैल कोणते या बैलगाड्याला लावायचे हे ठरणे बाकी असल्याचे म्हणत भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केलाय.. तसेच शेतकरी मित्र राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या माध्यमातून बीड मतदारसंघात बांधणे सुरू केली आहे..

Nanded News : दूषित पाणी प्यायल्याने जवळपास सातशे नागरिकांना त्रास, ग्रामसेवक निलंबित

नांदेडच्या नेरली गावात शुक्रवारी मध्यरात्री शेकडो ग्रामस्थांना जुलाबा व उलट्या, मालमळीचा त्रास झाल्याने त्यांच्यावर नांदेड शहरातील वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दूषित पाण्यामुळे हा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळपास सातशे लोकांना या त्रासातून जावे लागले. अनेक रुग्णांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याने त्यांच्या बिलावर तोडगा काढणे जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमोर मोठं आव्हान आहे.

तर गावातील सार्वजनिक नळ योजनेचे पाणी नमुने तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आज प्रशासनाकडे प्राप्त होणार आहे. आरोग्य विभागाचे पथक अजूनही गावात तळ ठोकून आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ नेरली येथील ग्रामसेवकांना निलंबित केले आहे.

Pandharpur News : नवरात्र उत्सवानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वच्छतेचे काम सुरू

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पासून स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आली आहे. येत्या 3 आक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे. यासाठी विठ्ठल आणि रूक्मिणी गाभार्यासह मंदिराची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. दोन दिवस स्वच्छतेचे काम सुरू राहणार आहे. दरम्यान दर्शन वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाही.

Maval News : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

रविवार सुट्टीच औचित्य साधून मावळातील लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे. गेल्या आठवडा भर पावसाने मावळात तुफान बॅटिंग केली होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे. लोणावळ्यातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरून लोहगडला पसंती दिली आहे.

Nagpur News : नागपूर येथील राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तब्बल ४८ हजार प्रकरणे निकाली

नागपूर जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आली होती. या अदालतीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय लोक अदलातमध्ये तब्बल ४८ हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण समझोता रक्कम कोटीच्या घरात गेली. घटस्फोट आणि कौटुंबिक वाद प्रकरणांतील २३ जोडप्यांमध्ये आपसी समझोता पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू झाला.

Amravati News : नितेश राणेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत हाय अलर्ट

अमरावतीच्या अचलपूर शहरात आज नितेश राणेंच्या उपस्थितीत 'हिंदू जन आक्रोश मोर्चा व धर्मसभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आली आहे. अचलपूर-परतवाडा शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. अमरावती ग्रामीण क्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राणेंच्या दौऱ्यामुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, असा अहवाल पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com