Maratha Aarakshan: मराठ्यांनी अन्न पाणी सोडलंय, आता तरी जागे व्हा; शिंदे गटाच्या खासदाराला तरुणाने सुनावले खडेबोल

Maratha Reservation News: मराठा तरुणाची शिंदे गटाच्या खासदारासोबत झालेल्या संवादाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.
Maratha protester and Hemant Patil audio clip
Maratha protester and Hemant Patil audio clipSaam TV
Published On

Maratha Reservation Latest News

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. एकीकडे मनोज जरांगे आमरण उपोषण करत असताना दुसरीकडे मराठा आंदोलक रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत. काही तरुणांनी तर राजकीय नेत्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. अशातच एका तरुणाची शिंदे गटाच्या खासदारासोबत झालेल्या संवादाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha protester and Hemant Patil audio clip
Breaking News: महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत; शरद पवार गटातील बडा नेता भाजपमध्ये करणार प्रवेश?

हिंगोलीचे शिंदे गटातील खासदार हेमंत पाटील यांना फोन करत मराठा तरुणाने आरक्षणासाठी लढा म्हणत चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. मराठा समाजातील लोकांनी अन्न पाणी सोडलं असून आतातरी जागे व्हा, असं म्हणत या तरुणाने हेमंत पाटील यांना आरक्षणावर भूमिका मांडण्याचं आवाहन केलं आहे. (Latest Marathi News)

इतकंच नाही तर, कोल्हापूर मधील शिवसेनेच्या अधिवेशनात नृत्य करता येतं, पण आरक्षणासाठी (Maratha Reservation) ठोस भूमिका मांडता येत नाही का? असा जाब देखील या तरुणाने हेमंत पाटील यांना विचारला आहे. दरम्यान, मराठा तरुण आणि हेमंत पाटील यांच्या संभाषणाची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा देणारा राज्यातील पहिला खासदार होतो, असं म्हणत हेमंत पाटील देखील तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देणार आहे, असं आश्वासन देखील हेमंत पाटील यांनी मराठा तरुणाला दिलं आहे.

दुसरीकडे हिंगोलीतील मराठा समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. हिंगोलीत भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी उपोषण सुरू केले आहे. लवकरच विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा कायदा करा, अन्यथा मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी मराठा आमदार तसेच खासदारांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com