Chhatrapati Sambhaji Nagar: मनोज जरांगेंच्या उपोषणाला विरोध केला, मराठा आंदोलकांनी डॉ.रमेश तारख यांच्या तोंडाला फासलं काळं,पाहा Video

Jhunjar Chhava sanghatana throw black ink: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध करणं डॉक्टर तारख यांना चांगलेच महागात पडलं. उपोषणाला विरोध केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर तारख यांच्या तोंडाला काळं फासलं आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar: मनोज जरांगेंच्या उपोषणाला विरोध केला, मराठा आंदोलकांनी डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला फासलं काळं, पाहा Video
Jhunjar Chhava sanghatana throw black ink On Dr Ramesh Tarakh
Published On

छत्रपती संभाजीनगरात मराठा संघटना आक्रमक झाली आहे. झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले आहे. अंतरवली सराटीमधील मनोज जरांगे यांच्या उपोषणाला डॉक्टर रमेश तारख यांनी विरोध केला होता. तसेच मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारख यांनी अर्ज दिला होता.

झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा आधी सत्कार केला आणि त्यानंतर काळे फासले. मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवली सराटी येथे केलेल्या उपोषणाला डॉक्टर तारख यांनी विरोध केला होता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी उपोषणाविरोधात अर्ज केला होता. तारख हे नेहमी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध करत असल्याची भूमिका घेतात. त्याच्या निषेधार्थ झुंजार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं आहे.

झुंजार संघटनेचे कार्यकर्ते आधी डॉक्टर तारख यांच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेले त्यानंतर त्यांचा सत्कार केला, त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळे फासले. भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांपैकी एका त्यांचे हात धरुन ठेवले त्यानंतर एकाने त्यांच्या तोंडाला काळे फासले.

छत्रपती संभाजीनगरमधील कार्यकर्ते होते, ते सेहल कोटकर यांचे मित्रमंडळी होते. त्यांनी सकाळी मला फोन करत पेशंट दाखवण्यासाठी आणणायचं असल्याचं सांगितलं. त्यांना आपण दुपार तीन वाजेपर्यंत येण्यासाठी सांगितले. त्यानंतर ते आले, बाहेर सुरक्षा रक्षकासोबतही त्यांनी अरेरावी केली. कार्यालयात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की, ते म्हणाले, आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तुमचा वाढदिवस आहे, फेसबुकवर तुमचा वाढदिवस असल्याचं म्हणत त्यांनी सत्कार करण्याचा बहाणा केला,असं डॉक्टर तारख म्हणाले.

पण माझा वाढदिवस नसल्याने मला त्यांचा संशय आला. कार्यालयात आलेल्या लोकांपैकी एकाने खांद्यावर शाल टाकली, दोन जणांनी दरवाजा लावला. एकाने हात धरून ठेवले त्यानंतर एकाने माझ्या चेहऱ्यावर काळे फासले. मनोज जरांगे पाटील यांचा विरोध का केला. त्यांच्याविरोधात निवेदन का दिलं, अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ केली, अशी माहिती तारख यांनी दिलीय.

Chhatrapati Sambhaji Nagar: मनोज जरांगेंच्या उपोषणाला विरोध केला, मराठा आंदोलकांनी डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला फासलं काळं, पाहा Video
Manoj Jarange VIDEO : छगन भुजबळ यांना दंगल घडवून आणायचीय, जशाच तसे उत्तर देऊ; मनोज जरांगे संतापले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com