Manoj Jarange Patil: राज्यात दंगली घडवायचा प्रयत्न, संभाजीराजे छत्रपतींच्या भेटीनंतर जरांगे यांचा आरोप

Maratha Reservation : राज्यात ओबीसी- मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आमनेसामने आलेत. त्यावर बोलतांना मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केलाय.
Manoj Jarange Patil: राज्यात दंगली घडवायचा प्रयत्न, संभाजीराजे छत्रपतींच्या भेटीनंतर जरांगे यांचा आरोप
Manoj Jarange Patil
Published On

मराठा -ओबीसी वाद नाही आम्ही उत्तर देत नाही म्हणून मस्ती चालली. त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करत आहेत. काही दिवसांपासून ते उपोषणावर बसलेत. आज संभाजीराजे छत्रपती या्ंनी मनोज जरांगे पाटील यांनी यांची भेट घेतली. यावेळी बोलतांना जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला.

गावखेड्यात ओबीसी-मराठा एक आहे. दोन्ही समाजात कोणताच वाद नाही. हे फक्त छगन भुजबळ यांची नाटक कंपनी आहे. यावेळी जरांगे यांनी छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्यावर टीका केली. गेली सहा महिने आम्ही एकही शब्द आणि त्यांचे नाव घेतलं नाही. मात्र त्यांना जातीवाद करायचा आहे. ते मराठ्या समाजाच्या मुलांना त्रास देऊ लागलेत. मी जेव्हा जेव्हा सांगितलं तेव्हा तेव्हा बदला घेतलाय. सध्या शांत व्हा, बाजुला व्हा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे.

यावेळी जरांगे यांनी ओबीसी समाजाला इशारा दिलाय. त्यांनी वडीगोद्री रास्ता बंद केला काही फरक पडत नाही. आम्ही रस्ता बंद केला असता तर म्हणले असते जातीला वाळीत टाकलं. महाराष्ट्र बघतोय मराठ्यांवर किती अन्याय सुरू आहे ते. सुरुवात त्यांनी केली आंदोलन संपल्यावर शेवट मी करणार. आंदोलन संपेपर्यंत धीर धरा.मी भिडा म्हणलो तर चटणीला पुरायचे नाही, अशा शब्दात जरांगेंनी ओबीसी समाजाच्या नेत्याला इशारा दिलाय.

आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे म्हणाले, मी तुमच्या साक्षीने सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. फडणवीस साहेबांना संधी आहे. बारा दिवस झाले मी राजकीय भाषा बोलत नाही. उपोषण सोडण्यावरून जरांगे यांनी संभाजीराजे यांना म्हणाले, राजेसाहेब आपण उठत नसतो पाणी घेत नसतो औषध घेत नसतो. मला अंमलबजावणी पाहिजे.

पोलिसांनी मराठा आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोप

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज मराठा समाज बांधवांच्या वतीने नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान मोर चौकात मराठा समाजाच्या काही बांधवांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आता होत आहे.

त्यानंतर आक्रमक झालेल्या मराठा बांधवांनी जिल्हाधिकारी गाठून जिल्हाधिकारी कार्यालय पुढे जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com