Hingoli News: साखळी उपोषणास बसलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, हिंगोलीतील घटना

Hingoli News: हिंगोलीत मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषणामध्ये बसलेल्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Hingoli News /File photos
Hingoli News /File photosSaam tv

Hingoli News:

हिंगोलीत मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषणामध्ये बसलेल्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी येथील शिंदी गावात ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शिंदी गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणादरम्यान एका उपोषणकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

प्रकाश नामदेवराव मगर असं ५५ वर्षीय उपोषणकर्त्याचे नाव आहे. हिंगोलीतील बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

You May Like

Hingoli News /File photos
Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याची हत्या; पक्षाचा प्रचार करून परतताना नक्षलवाद्यांनी केली निर्घृण हत्या

मगर हे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलन व उपोषणामध्ये सक्रिय सहभागी झाले होते. सध्या प्रकाश मगर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतही शिंदी गावात साखळी उपोषण सुरू होतं. साखळी उपोषणामध्ये शनिवारी गावातील प्रकाश नामदेव मगर देखील उपोषणास बसले होते. उपोषणादरम्यान संध्याकाळीच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना पोतरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं.

Hingoli News /File photos
Maratha Reservation: 'मराठा आरक्षण मिळावे हीच इच्छा...' चिठ्ठी लिहून चाकणमधील २२ वर्षीय तरुणाने संपवले आयुष्य

प्रकाश यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केल्यानंतर डॉ.मदन गारोळे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तातडीने त्यांना हिंगोली येथील रुग्णालयात पाठवले. मात्र, तेथील रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. प्रकाश मगर यांच्या मृत्यूने त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com