Jalna News: आरक्षणाची मागणी करत मराठा आंदोलकाने संपवलं जीवन; मन सुन्न करणाऱ्या घटनेनं अख्खं गाव हळहळलं

Ambad Taluka News: जालना जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आरक्षणाची मागणी करत एका मराठा आंदोलकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
Jalna Maratha Andolan News
Jalna Maratha Andolan NewsSaam TV
Published On

Jalna Maratha Reservation News

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. सरकारने तातडीने सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. अशातच जालना जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आरक्षणाची मागणी करत एका मराठा आंदोलकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalna Maratha Andolan News
Atal Setu Mumbai: अटल सेतू तब्बल १० तासांसाठी राहणार बंद; मुंबईकरांचा होणार खोळंबा, काय आहे कारण?

संदिपान आनंदराव चौधरी (वय ४१ वर्ष) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. संदिपान हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चिकनगावाचे रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपासून चौधरी हे मराठा आंदोलनात (Maratha Reservation) सहभागी होते. शनिवारी (१७ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास त्यांनी वडाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

संदिपान यांच्या निधनाने संपूर्ण अंबड शहरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदिपान हे पहिल्या दिवसापासून मराठा आंदोलनात सक्रिय होते. सरकारकडून मराठा आरक्षणासाठी चालढकल होत असल्याने ते नैराश्यात गेले होते. (Latest Marathi News)

राज्य सरकार मराठा समाजावर अन्याय करत असल्याची खंत त्यांनी आपल्या मित्रांकडे व्यक्त केली होती. दरम्यान, शनिवारी पहाटेच्या सुमारास संदिपान यांनी चिकनगावातील लोणार भायगाव शिवार गट न. 59 मध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या रुमालावर एक मराठा लाख मराठा असं वाक्य लिहून ठेवलं.

दरम्यान, संदिपान यांच्या आत्महत्येची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती पोलीस पाटील आणि सरपंच यांनी अंबड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू केला. संदिपान यांनी अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Jalna Maratha Andolan News
Rain Alert: महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com