Beed News
Beed NewsSaam TV

Beed News : मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करणार नाही, बीडमधील ग्रामस्थ आक्रमक

Maratha Andolan : राज्यात अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
Published on

Beed News :

जालना येथे सराटे अंतरवालीमध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत.

राज्यात अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. बीडमधील एका गावाने जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत भाजपला मतदान करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

Beed News
Sanjay Raut: सांगा आम्हाला तो अदृश्य हात कुणाचा होता? संजय राऊतांचा सरकारला सवाल

बीडमधील बेलवाडी ग्रामस्थांनी अशी शपथच घेतली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत भाजपला मतदान करणार नाही. एवढेच नाही तर या ग्रामस्थांनी आपण मतदान करणार नसल्याची देखील शपथ घेतली आहे.

केंद्रात भाजपची सत्ता आहे, आरक्षणाचा तिढा केंद्रातून सुटू शकतो. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत आम्ही गावकरी येणाऱ्या लोकसभेला भाजपाला मतदान करणार नाही, असा आक्रमक पवित्रा बेलवाडी येथील नागरिकांनी घेतली आहे. (Latest News Update)

Beed News
Fake Army Offcer Arrest : लष्करी गणवेश, बॅच... लेफ्टनंट असल्याचं तंतोतंत भासवलं; पण एक चूक अन् थेट तुरुंगात रवानगी

सरकारची काढली अंत्ययात्रा

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पडसाद उमटू लागले आहेत. बीडच्या माळेवाडी गावामध्ये सरकारची अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यातील माळेवाडी या गावामध्ये मराठा समाज बांधवांनी सरकारची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com