Sanjay Raut: सांगा आम्हाला तो अदृश्य हात कुणाचा होता? संजय राऊतांचा सरकारला सवाल

Sanjay Raut On Jalna Police Lathi Charage: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सरकावर जहरी टीका केली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV
Published On

Maratha Reservation Case:

जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलनातील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. शुक्रवारी ही घटना घडल्यानंतर शनिवारी आणि आज रविवारी देखील राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसत आहेत. अशात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सरकावर जहरी टीका केली आहे. (Latest Marathi News)

"अदृश्य फोन कुणाचा होता? तो गृहमंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचा की आणखीन कुणाचा होता? की दिल्लीतून आला होता. फोन आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. सांगा आम्हाला तो अदृश्य हात कोणाचा होता?", असा प्रश्न संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

पुढे ते म्हणाले की, "ज्याने लाठीमार करण्याचे आदेश दिले. हिंमत असेल तर नाव सांगा नाहीतर आम्ही सांगू. एवढा मोठा निर्णय पोलिसांच्या स्थानिक पातळीवर घेतला जात नाही. मराठा आरक्षण हा फार संवेदनशील विषय आहे. "

पोलीस अधीक्षकांचे निलंबन नको तर सरकारने पायउतार व्हायला हवे

जालनामध्ये पोलीस अधीक्षकांचा दोष काय? उलट सरकारनेच त्यांना आदेश दिले त्यांनी आदेशाचे पालन केले, असं नाना पटोलेंनी म्हटलंय. सरकारने सौम्य लाठीमार करण्याचा आदेश कसा काय दिला. त्यामुळे पोलीस अधीक्षकांचे निलंबन नको तर सरकारने पायउतार व्हायला हवे, अशी मागणी पटोलेंनी केली आहे.

एकाचे आरक्षण काढून दुसऱ्याला द्या असे होऊ शकत नाही. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

लाठीचार्जमुळे मराठवाड्यातील जनसंवाद यात्रा काही दिवस पुढे ढकलली यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, "आज आम्ही जालना दौऱ्यावर जाणार आहोत. पाच वाजता तेथे पोहोचू. जालन्यात घडलेल्या घटनेची माहिती घेणार असून. ही सरकार पुरस्कृत यात्रा आहे, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय. मराठा समाजाच्या आंदोलनावर आतापर्यंत लाठीचार्ज झाला नाही. गृह विभाग खोटं बोलतायेत. जखमी पोलिसांचा आकडा वाढवून सांगितला जातोय. गेल्या वेळेस भिडे मास्तरांचे समर्थन केले आता मराठा समाजाला दोषी ठरवतात, अशा शब्दांत वड्डेटीवारांनी सरकावर ताशेरे ओढलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com