सचिन जाधव, अभिजीत सोनवणे, राजेश काटकर
माराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे आज सलग पाचव्या दिवशी पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बस रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे पुण्यातून मराठवाडा विदर्भ आणि सोलापूरला जाणाऱ्या ७५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे मराठवाडा विदर्भ जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पुण्यातून एसटी बसच्या दररोज १ हजार ५५६ फेऱ्यांची नियोजन केले जाते. आंदोलनामुळे ७५० फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. प्रामुख्याने बीड जिल्ह्यासह अमरावती,नागपूर,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातील फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
आकडेवारी
पुणे विभागातून सुटणाऱ्या फेऱ्या १५५६
आंदोलनामुळं रद्द झालेल्या फेऱ्या ७७०
पुणे विभागाचे आर्थिक नुकसान ४० लाख २७ हजारपेक्षा जास्त
परभणी जिल्ह्यातही मराठा आरक्षणाची धग कायम आहे. चार दिवसांपासून परभणी, पाथरी, गंगाखेड, जिंतूर , हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या सात आगारातून धावणारी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने परभणी विभागाला पावणे दोन कोटींचा फटका बसला आहे. लाल परीची सेवा बंद असल्याने खाजगी वाहन धारकांचे मात्र अच्छे दिन आले तर प्रवाशांच्या खिशाला मात्र मोठी कात्री बसली आहे.
सोमवारपासून नाशिकहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस देखील बंदच आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मागील ४ दिवसांपासून नाशिकहून मराठवाड्याकडे जाणारी एसटी सेवा बंद आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड, परभणी, पैठण यासह मराठवाड्यातील अन्य शहरात जाणारी एसटी सेवा बंद आहे.
आंदोलकांकडून एसटी बसेसना टार्गेट केलं जात असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून नाशिकहून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्यात. मागील ४ दिवसांपासून बससेवा बंद असल्याने प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.