Maratha Aarskhan: कुणबी प्रमाणपत्रांसाठी प्रयत्न सुरू; निजामकालीन मराठवाड्यातील ५८ गावे सोलापूरमध्ये सापडली

Maratha Aarskhan: मराठवाडा मुक्तीनंतर मराठवाड्यातील ५८ गावे प्रशासनाच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आली होती.
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv news
Published On

विश्वभूषण लिमये

Maratha Reservation:

निजामकालीन मराठवाड्यातील ५८ गावे सोलापूर हद्दीत असून, या गावांची नावे धारशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहेत. मूळची तुळजापूर आणि परांडा तालुक्यातील ही गावे माढा, मोहोळ,बार्शी, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात विभागली आहेत.

Maratha Reservation
Maratha Reservation : राज्यभरात राज्यात १३९ गुन्हे दाखल; ३ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद: पोलीस महासंचालक रजनीश सेठ

धारशिवच्या प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्यानंतर सोलापुरातील ५८ गावांचा शोध घेण्यात आला. या गावांची माहिती धारशिवकडे पाठविली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिलीय. मराठवाडा मुक्तीनंतर मराठवाड्यातील ५८ गावे प्रशासनाच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आली होती.

धाराशिव जिल्हा प्रशासनाने हे गॅझेट आणि पुरावे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे सादर केले. या ५८ गावांपैकी एकुरके येथील पंडित ढवण आणि भोयरे गावचे बालाजी साठे यांनी धाराशिव येथे शिंदे समितीसमोर आपली भूमिका मांडली.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्याला जो न्याय मिळेल, तोच न्याय सोलापुरातील निजामकालीन ५८ गावांना मिळावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात तापला आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा ९ वा दिवस आहे. जरांगेंनी काल रात्रीपासून पाणी पिणे देखील बंद केलेय. अशात आज जरंगे पाटलांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्ठमंडळ जाणार आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्यासह निवृत्त न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव जरंगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी सरकर मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाजू संमजावून सांगितली जाईल. याच शिष्ठमंडळाकडून जरंगे पाटील यांची समजूतकाढून सरकारला थोडा वेळ देण्यातयावा यासाठी विनंती करून आंदोलन मागे घ्यावे अशीही विनंती केली जाणार आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation: राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार; मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com