Satara Band : साता-यात बाजारपेठेत कडकडीत बंद, एसटी सेवा सुरळीत सुरू (पाहा व्हिडिओ)

maratha kranti morcha latest updates : नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पाेलिस दलाने केले आहे.
satara band news, maratha reservation, maratha aarkshan
satara band news, maratha reservation, maratha aarkshansaam tv
Published On: 

Maratha Kranti Morcha Latest Updates : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarathi) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) उपोषणास बसलेल्या आंदाेलकांवर केलेल्या लाठीहल्लाचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (साेमवार) सातारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या बंद कालावधीत काेणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाेलिसांनी चाेख बंदाेबस्त ठेवला आहे. (Maharashtra News)

satara band news, maratha reservation, maratha aarkshan
Swabhimani Shetkari Sanghatana : गायब झालेल्या 'स्वाभिमानी' च्या प्रशांत डिक्कर यांचा व्हिडिओ व्हायरल, सरकारला दिला अल्टीमेटम

सकल मराठा समाजने आवाहन केल्यानूसार आज साता-यातील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरातील माेती चाैक, पाेवई नाका तसेच बस स्थानक परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. या बंदमध्ये छाेटे छाेटे व्यावसायिक देखील सहभागी झाली आहेत. (satara band latest marathi news)

satara band news, maratha reservation, maratha aarkshan
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ' ला उच्च न्यायालयाचा दणका, आजपासून सभासदांना भेटणार : शाैमिका महाडिक (पाहा व्हिडिओ)

दरम्यान राज्य परिवहन महामंडळाने बंदच्या पार्श्वभूमीवर सावध पावले उचलल्याचे दिसत आहे. शहरातील नजीकच्या फे-या कमी करण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई, काेल्हापूर तसेच अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी प्रवाशांना बस उपलब्ध आहेत. रिक्षा व्यावसायिक देखील कमी प्रमाणात बस स्थानक तसेच राजवाडा परिसरात दिसत आहे.

शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालयांनी तसेच खासगी क्लासेस बंद ठेवण्यात आली आहेत. काही ठिकाणी शाळा सुरु हाेत्या. शिक्षकांनी सूचना देऊन विद्यार्थ्यांना घरी साेडले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.