जरांगेंची तब्येत बिघडली, आंदोलन चिघळणार? राज्यभरात जरांगेंचे समर्थक रस्त्यावर

Manoj Jarange Patil rejects Maharashtra government draft: सरकारनं पाठवलेला मसुदा जरांगेंनी धुडकावून लावलाय. तर दुसरीकडे जरांगेंची प्रकृती बिघडल्यामुळे राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत? त्यामुळे आंदोलन चिघळू लागलंय. काय आहे मसुदा आणि जरांगें त्यांच्या कोणत्या मागण्यांवर ठाम आहेत?
Manoj Jarange Patil,
Manoj Jarange Patil,saam tv
Published On

गेल्या पाच दिवसांपासून जरांगे पाटील अंतरवालीत आमरण उपोषणाला बसलेत..मात्र या अन्नपाण्यावाचून सुरु असलेल्या उपोषणामुळे जरांगेंची प्रकृती खालावल्यानं तिढा वाढलाय. कारण याचे आता संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटू लागले आहेत. उपोषणादरम्यान जरांगे यांना उलटी, मळमळ आणि अशक्तपणा जाणवत असून त्यांची बीपी आणि शुगर लेव्हल देखील खाली आलीय... महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय तपासणीनंतर जरांगेंनी उपचाराला स्पष्ट नकार दिलाय...

दरम्यान जरांगे यांची प्रकृती खालवल्यानं मराठा आंदोलकांमध्ये राज्यभरात संतापाची लाट उसळलीय.. मराठा आंदोलकांनी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलन करत जरांगेंना पाठिंबा दर्शवलाय... दुसरीकडे लातूरमध्येही मराठा समाज आक्रमक झालाय... 3 ऑगस्टला मराठ्यांना लातूर बंदची हाक देत... छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या केलाय...शासनाने लवकरात लवकर मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, या मागणीसाठी मराठा समर्थकांनी जालना बंदची हाक देत आंदोलन पुकारलयं..

बीडमध्येही आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मध्य़रात्री टायर जाळून सरकारचा निषेध केला.. तसचं बीड- परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरुड फाट्यावरही रास्ता रोको करत आंदोलनांची आक्रमक पवित्रा घेतला..

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण शहरातही मराठ्यांनी जरांगेंना पाठिंबा दर्शवत टायर जाळून आंदोलन केलं...परभणीतील पाथरी शहरातही मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन करत महामार्गावरील वाहतुक रोखली...राज्यभरात याचे पडसाद उमटू लागल्यामुळे सरकारची धावाधाव सुरू आहे... मंत्र्य़ांच्या शिष्यमंडळानंही संभाजीनगरमध्ये मुक्काक ठोकून जरांगेंना मागण्यांच्या पूर्ततेचा मसुदा पाठवलाय. मात्र हा मसुदा वाचलेला नसून 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रमाणपत्र वाटण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. शिष्टमंडळानं मसुदा जरांगेंकडे पाठवल्यानं मागण्यासंदर्भातील अंतिम निर्णय आता जरांगेंच्या कोर्टात होणार आहे...त्यामुळे जरांगे शिष्टमंडळानं दिलेल्या मसुद्यात बदल सुचवतात की मसुद्याला सहमती दर्शवून उपोषण मागे घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com