Manoj Jarange Patil Rally: संभाजीनगरमध्ये १३ जुलैला जरांगे पाटील यांची रॅली, जालना रोड ८ ते ९ तास राहणार बंद

Mahashantata Rally On July 13 In Chhatrapati Sambhajinagar: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीला ६ जुलैपासून सुरूवात झाली. या महाशांतता रॅलीचा समारोप १३ जुलैला संभाजीनगरमध्ये होणार आहे.
Manoj Jarange Patil Rally: संभाजीनगरमध्ये १३ जुलैला जरांगे पाटील यांची रॅली, जालना रोड 8 ते 9 तास राहणार बंद
Manoj jarange Patil Saam TV

माधव सावरगावे, संभाजीनगर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची येत्या १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅली निघणार आहे. त्यामुळे जालना रोड ८ ते ९ तास बंद राहणार आहे. जरांगे पाटील यांच्या रॅलीच्या निमित्ताने प्रशासन देखील कामाला लागले आहे. संभाजीनगरच्या सिडको चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. १०० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ४००० पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात येणार आहे.

Manoj Jarange Patil Rally: संभाजीनगरमध्ये १३ जुलैला जरांगे पाटील यांची रॅली, जालना रोड 8 ते 9 तास राहणार बंद
Chhatrapati Sambhajinagar: बस थांबवण्यावरून वाद, महिला कंडक्टरकडून प्रवाशांना मारहाण; धक्कादायक VIDEO व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांची महाशांतता रॅली १३ जुलैला छत्रपती संभाजीनगरात पार पडणार आहे. या रॅलीसाठी पोलिस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. सकाळी ११ वाजता संभाजीनगरच्या सिडको येथील वसंतराव नाईक चौकातून या रॅलीला प्रारंभ होणार आहे. तर क्रांती चौक येथे या रॅलीचा समारोप होणोर आहे. जरांगे पाटील यांच्या या महाशांतता रॅलीमध्ये मोठ्यासंख्येने मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Patil Rally: संभाजीनगरमध्ये १३ जुलैला जरांगे पाटील यांची रॅली, जालना रोड 8 ते 9 तास राहणार बंद
Manoj Jarange Patil :...तर विधानसभेत ताकद दाखवून देणार...; बीडमध्ये मनोज जरांगे पाटील आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार

या महाशांतता रॅलीसाठी मुख्य वर्दळीचा मार्ग असलेला जालना रोड सुमारे ८ ते ९ तासांसाठी बंद राहणार आहे. या रॅलीसाठी १०० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ४००० पोलिसांचा तगडा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान या रॅलीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून समन्वयकांना सूचना देण्यात आल्या आहेत. या रॅलीवर विशेष लक्ष राहणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीला ६ जुलैपासून सुरूवात झाली. या महाशांतता रॅलीचा समारोप शनिवारी संभाजीनगरमध्ये होणार आहे. यासाठी जिल्हाभरासह संपूर्ण मराठवाड्यातून मराठा समाज बांधव येणार आहे.

Manoj Jarange Patil Rally: संभाजीनगरमध्ये १३ जुलैला जरांगे पाटील यांची रॅली, जालना रोड 8 ते 9 तास राहणार बंद
Manoj Jarange: धाराशिवच्या भर सभेत मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर सडकून टीका!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com