Manoj Jarange
Manoj Jarange PatilSaam Digital

Manoj Jarange : हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, नारायण गडावर दसरा मेळावा, व्यासपीठ उभारणीचे नारळ फोडून पूजन

Dasara Melava : राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातही व्यवस्था करण्यात येणार आहे.
Published on

Manoj Jarange Dasara Melava : बीड जवळील नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा होणार आहे. याच ठिकाणची पाहणी करण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील हे नारायणगड येथे आले होते. या ठिकाणी 400 एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर उर्वरित जागेवर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष आरोग्य पथक नेमण्यात आले आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातही व्यवस्था करण्यात येणार आहे.

आज नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठाचे उभारणीचे नारळ फोडून पूजन केले गेले. प्रत्येकजण या दसरा मेळाव्याची वाट बघत आहे. कितीही लाखो लोक आले तरी त्यांची पूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. यावरून कुठलेही राजकारणाची भाष्य केले जाणार नाही. मेळावा हा पूर्ण पणे पारंपरिक असणार आहे. दसरा मेळावा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने याला हिंदू धर्मात महत्त्व आहे. दुःखाकडून सुख समृद्धीकडे जाण्याचा संदेश या दिवशी देण्यात येईल. हा दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. या मेळावातून जातीय एकोपा टिकून राहणार आहे. गडाच्या सर्व मर्यादा पाळून यंदाचा दसरा मेळावा होणार आहे, असे जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

विखे पाटलांच्या भेटीवर काय म्हणाले...

विखे पाटील यांनी रात्री भेट घेतली याबद्दल विचारले असता रात्री मला अनेकजण भेटायला येतात, तेही भेटायला आले होते. त्यांच्याबरोबर मराठा आरक्षण आणि सामाजिक विषयावर चर्चा झाली, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले

केज मतदार संघातून काढणारा 100 गाड्यांचा ताफा - इनामदार

बीडच्या नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे.. या मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यातून लाखो दलित- मुस्लिम बांधव देखील जाणार आहेत. यासाठी केजच्या नगराध्यक्ष सीता बनसोड व माजी नगराध्यक्ष हारून इनामदार हे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. हा मेळावा सामाजिक एकतेची नांदी ठरणार असल्याचे हारून इनामदार यांनी म्हटले असून या मेळाव्या करता ते स्वतः केज मधून 100 वाहनांच्या ताफ्यातून दलित व मुस्लिम बांधवांसह नारायण गडाकडे रवाना होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com