Manoj Jarange Health: मनोज जरांगे यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज; तपासणी अहवाल पाहून डॉक्टरही चिंताग्रस्त

Manoj Jarange Health Latest Updates: डॉक्टरांच्या एका पथकाने मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी केली असून त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आल्याचं समोर आलं आहे.
Manoj Jarange Health Latest Updates in Marathi
Manoj Jarange Health Latest Updates in MarathiSaam TV
Published On

Manoj Jarange Health Latest Updates: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलनाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा नववा दिवस असून अन्न पाण्याचा त्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. सकाळपासूनच जरांगे यांना अस्वस्थ वाटत आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांची तपासणी केली असून त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आल्याचं समोर आलं आहे.  (Latest Marathi News)

Manoj Jarange Health Latest Updates in Marathi
Maratha Reservation: मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिल्यास देशभरात आंदोलनं करू; ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा

मनोज जरांगे यांचा तपासणी अहवाल पाहून आता डॉक्टरही चिंताग्रस्त झाले आहेत. आपण आंदोलन मागे घेऊन उपोषणाचा त्याग करावा, अशी विनंती जरांगे पाटील यांना सरकारमधील मंत्र्यांसह पोलीस तसेच डॉक्टरांनी केली आहे. मात्र, मराठा समाजाला जोपर्यत कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, सरकार याचा जीआर काढत नाही, तोपर्यंत मी तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

घशात इन्फेक्शन आणि शरीरात ताकद राहिली नसल्याने आज सकाळपासूनच मनोज जरांगे यांनी नीट बोलताही येत नाहीये. त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच पोलिसांसह डॉक्टरांचं एक पथक उपोषणस्थळी रवाना झालं होतं. मनोज जरांगे यांना सलाईन लावल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली.

Manoj Jarange Health Latest Updates in Marathi
Yavatmal News: गरम होतंय म्हणून घरात कुलर लावला, काही क्षणातच अनर्थ घडला; माय-लेकांना मृत्युने कवटाळलं

या तपासणी अहवालात जरांगे यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आल्याचं समोर आलं आहे. जरांगे यांच्या शरीराची ऑक्सिजन लेव्हल ९७ इतकी आहे. त्यांचा बीपी ११० ते ७० दरम्यान आहे. तर पल्स रेट ८८ इतका असून रँडम शुगर ११२ वर असल्याची माहिती तपासणी अहवालातून समोर आली आहे. दुपारनंतर डॉक्टर पुन्हा एकदा जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करणार आहे.

त्यांच्या LFT आणि KFT आणि CBC या रक्त चाचण्या करण्यात येणार आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी प्राथामिक उपचार केल्यानंतर जरांगे यांनी साम टीव्हीसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. सरकारने माझा जीवच घ्यायंच ठरवलंय, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. दोन वर्षे मी सरकारसोबत तहच करतोय, त्यांनी आमच्या पदरात काहीच टाकलं नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com