मंत्र्यांची जरांगेंशी चर्चा निष्फळ, जरांगे आंदोलनावर ठाम, सरकारला धास्ती

Manoj Jarange August 29 Protest Maratha Reservation: येत्या 29 ऑगस्टला जरांगेंनी निर्णायक आंदोलनाची घोषणा करत सरकारला अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची आंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतलीये. या भेटीत काय चर्चा झालीये?... जरांगेंनी सरकारसमोर काय भूमिका घेतलीये?...पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
MANOJ JARANGE ON AUGUST 29 PROTEST
MANOJ JARANGE ON AUGUST 29 PROTESTsaam tv
Published On

कुणबी नोंदींवरून ओबीसी दाखले देण्यासाठी जरांगेंनी थेट मुंबईत धडक देण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे सरकारची आता धावाधाव सुरू झालीय. जरांगेंचं मुंबईतील आंदोलन रोखण्यासाठी आरक्षण उपसमितीनं बैठकाचं सत्र सुरु केलं आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं थेट आंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली... यावेळी कुणबी नोंदी अवैध ठरवल्याप्रकरणी जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेत मंत्र्यांवरच निशाणा साधला..

मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं माध्यमांसमोरच जरांगेंशी तब्बल दोन तास चर्चा केली. त्यानंतर मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं एका सरपंचाच्या घरी जाऊन गुप्त चर्चा केली...या गुप्त चर्चेनंतर पुन्हा एकदा मंत्र्य़ांचं शिष्टमंडळ आणि जरागे माध्यमांसमोर आले... त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी दाखले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशारा दिला आणि जरागेंनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती केली...मात्र जरांगेंनी 29 ऑगस्टच्या उपोषणावर ठाम असल्याचं सांगीतलं.

एकंदरित मंत्र्यांच्या शिष्टमंडाळची जरांगेंसोबत झालेली गुप्त चर्चा निष्फळ ठरलीय..जरांगेंनी सरकारला 28 ऑगस्टचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे सरकारची धास्ती वाढलीय. जरांगे आता 29 ऑगस्टचं आंदोलन आंतरवाली सराटीत करतात की मुंबईत धडक देतात याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com