Maratha activist Manoj Jarange Patil reacts after Sunetra Pawar takes oath as Maharashtra’s first woman Deputy Chief Minister.
Maratha activist Manoj Jarange Patil reacts after Sunetra Pawar takes oath as Maharashtra’s first woman Deputy Chief Minister.Saam Tv

राज्यात पवार नावाचं वलय कायम ठेवायचं असेल तर..., सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच मनोज जरांगेंचं मोठं विधान

Manoj Jarange Reaction On Sunetra Pawar Deputy Cm Oath: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पवार कुटुंबाच्या एकजुटीवर मोठं विधान केलं आहे.
Published on

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना: अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा वारसा कोण पुढे घेऊन जाणार? तसेच पुढचा उपमुख्यमंत्री कोण होणार? असे अनेक प्रश्न राज्याच्या राजकारणात एकमेकांना विचारले जात होते. अखेर आज या सर्वांचे उत्तर राज्याला मिळाली. दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून इतिहासात नोंद केली.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना मंत्री म्हणून आणि गोपनीयतेची शपथ दिली. हा कार्यक्रम अगदी कमी लोकांमध्ये लोकभवन येथे पार पडला. दरम्यान यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maratha activist Manoj Jarange Patil reacts after Sunetra Pawar takes oath as Maharashtra’s first woman Deputy Chief Minister.
शिक्षकांची परीक्षा; इलेक्शन ड्युटी होणार रद्द

मनोज जरांगे नेमक काय म्हणाले?

राज्यात पवार नावाचं वलय कायम ठेवायचं असेल तर पवार कुटुंबानं गुप्त पद्धतीने का होईना एकमेकांना साथ द्यावी आणि एकसंघ राहावं अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते. सुनेत्रा पवारांसह त्यांच्या दोन्हीही मुलांवर आता मोठी जबाबदारी आली आहे. मात्र अजित पवारांचा वारसा सुनेत्रा पवार सक्षमपणे चालवतील असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर व्यक्त केला आहे.

Maratha activist Manoj Jarange Patil reacts after Sunetra Pawar takes oath as Maharashtra’s first woman Deputy Chief Minister.
राजकारणाचा विचका झालाय; राष्ट्रवादीचा अध्यक्ष 'पाटील' असावा, पटेल नाही, सुनेत्रा पवारांनी शपथ घेताच राज ठाकरेंची पोस्ट

मरगळ झटकून आता ठाकरे, पवार कुटुंबानं सक्षमपणे उभं राहावं अशी अपेक्षा देखील जरांगे यांनी व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्यानं दादांची जागा दादांच्या परिवाराला मिळाली हे चांगलं झालं असंही त्यांनी नमूद केलं. शरद पवार यांच्यासह पवार कुटुंब आणि देवेंद्र फडणवीस हे सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे ढाल म्हणून उभे राहतील अशी आशाही जरांगे यांनी व्यक्त केली. दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून अजित पवार गटाच्या नेत्यांनी बैठक घेतली की नाही याबाबत मला काहीही माहिती नसल्याचं जरांगे म्हणाले.

माझ्या घातपात प्रकरणात धनंजय मुंडेंच्या SIT चौकशीची मागणी राज्याच्या गृह मंत्रालयाकडे करणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ही मागणी केली जाणार असल्याच जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com