Manohar Mama: साताऱ्यात न जाण्याच्या अटीवर; मनोहर मामाला जामीन मंजूर
Manohar Mama: साताऱ्यात न जाण्याच्या अटीवर; मनोहर मामाला जामीन मंजूरSaam TV

Manohar Mama: साताऱ्यात न जाण्याच्या अटीवर; मनोहर मामाला जामीन मंजूर

मनोहर भोसले याच्यावतीने जामीनसाठी अर्ज करण्यात आलेला होता. न्यायालयाने घालून दिलेल्या काही अटी शर्तीवर जवळपास 132 दिवसानंतर मनोहर मामाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Published on

सोलापूर : मनोहर मामा भोसले (Manohar Bhosle) विरोधात बारामती येथे आर्थिक फसवणूक संदर्भात तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे महिला अत्याचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सप्टेंबर 2021 पासून तो अटकेत होता.

सध्या मनोहर भोसले याच्यावर अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी तपास पूर्ण करत आरोपपत्र दाखल केलेले होते. त्यामुळे मनोहर भोसले याच्यावतीने जामीनसाठी अर्ज करण्यात आलेला होता. न्यायालयाने घालून दिलेल्या काही अटी शर्तीवर जवळपास 132 दिवसानंतर मनोहर मामाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Manohar Mama: साताऱ्यात न जाण्याच्या अटीवर; मनोहर मामाला जामीन मंजूर
Wine : 'मद्यपान हानिकारकच;' आम्ही कोणालाही वाईन प्या, असं म्हणणार नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनोहर मामाचा जामीन मंजूर करताना न्यायालयाने फिर्यादी महिलेच्या सातारा जिल्ह्यात (Satara District) जाण्यासाठी मनाई केलीय. जामीन मिळाल्याने उपचार सुरू असणाऱ्या मनोहर भोसलेला मोठा दिलासा मिळाला आहे

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com