Manmad Krushi Utpanna Bazar Samiti News : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवड बिनविराेध; NCP कडे सभापतीपद, ठाकरे गटास उपसभापतीपद

या निवडीनंतर दाेन्ही गटातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला.
Manmad Krushi Utpanna Bazar Samiti, Former MLA Sanjay Pawar
Manmad Krushi Utpanna Bazar Samiti, Former MLA Sanjay Pawarsaam tv

- अजय सोनवणे

Manmad APMC News : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापतीपदी महाविकास आघाडीचे प्रमुख राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी आमदार संजय पवार (former mla sanjay pawar) तसेच उपसभापतीपदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कैलास भाबड (kailas bhabad) यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर दाेन्ही नूतन पदाधिका-यांच्या समर्थकांनी त्यांचे जाेरदार घाेषणाबाजी करीत अभिनंदन केले. (Breaking Marathi News)

Manmad Krushi Utpanna Bazar Samiti, Former MLA Sanjay Pawar
Shahu Chhatrapati Gold Cup Football Tournament News : शिवाजी तरुण मंडळाने जिंकला शाहू छत्रपती गाेल्ड कप; Chenda वाद्याची राजघराण्याला भूरळ (पाहा व्हिडिओ)

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (manmad krushi utpanna bazar samiti) पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीने १८ पैकी १२ जागा पटकाविल्या. महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार संजय पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांच्या गटाने या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना मोठा धक्का दिला.

Manmad Krushi Utpanna Bazar Samiti, Former MLA Sanjay Pawar
Udayanraje Bhosale On Sharad Pawar : विश्वासघात... उदयनराजेंनी एका वाक्यात शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा घेतला समाचार

आज बाजार समितीच्या पदाधिका-यांच्या निवडी हाेत्या. सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. दाेन्ही (सभापतीपद आणि उपसभापतीपद) पदासांठी एकेक अर्ज आले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापतीपदी महाविकास आघाडीचे प्रमुख राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी आमदार संजय पवार तसेच उपसभापतीपदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कैलास भाबड यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीनंतर दाेन्ही गटातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com