Manikrao Kokate: कोकाटेंना सत्तेची मस्ती' विजय वडेट्टीवारांचा कोकाटेंवर हल्लाबोल कोकाटेंची असंवेदनशीलता, बावनकुळेंकडून माफी, VIDEO

Insensitive Statement: कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल महसूल मंत्र्यांनी माफी मागितलीय..मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? कोकाटेंनी कोणतं वादग्रस्त वक्तव्य केलं? आणि त्यावरुन विरोधकांनी सरकारचे कसे उट्टे काढलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
MANIKRAO KOKATE
MANIKRAO KOKATESAAM TV
Published On

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय.. अवकाळीने उध्वस्त झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी गेलेल्या कोकाटेंनी कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य केलंय..

कोकाटेंच्या बेजबाबदार वक्तव्यावरुन काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र कोकाटेंच्या वक्तव्याबद्दल सरकारच्या वतीने माफी मागण्याची भूमिका घेतलीय...

MANIKRAO KOKATE
Karuna Munde : 'तुझ्या मुलीला उचलून घेऊन जाऊ', करुणा मुंडे यांना धमकीचे मेसेज; धक्कादायक आरोप

राज्यात अवकाळीने फळबागा आणि काढणीला आलेली पिकं भुईसपाट झालीत.. त्याबद्दल पंचनामे करणंही बाकी आहेत...मात्र सरकारने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याऐवजी थेट शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशीलपणे वक्तव्य केलंय.. त्यामुळे सुटाबुटातील कोकाटेंनी डोक्यावरचं आभाळ फाटलेल्या शेतकऱ्यांबद्दल तरी संवेदनशीलता बाळगायला हवी...अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com