Malegaon Sugar Factory Election: माळेगाव कारखाना निवडणुकीत दादांची हवा; अजित पवारांच्या पॅनेलनं मारली बाजी, विरोधकांचा सुपडा साफ

Ajit Pawar Panel: माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार यांनी प्रभावी आणि आक्रमक प्रचार केला होता. त्याचाच परिणाम निकालात दिसत आहे. अजित पवार यांच्या पॅनेलनं विरोधकांचा सुफडा साफ केलाय.
 Malegaon Sugar Factory Election Ajit Pawar Panel
Malegaon Sugar Factory Electionsaam tv
Published On

माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवार हे दादा ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने २० जागा जिंकल्या आहेत. गुरुशिष्यांचा सहकार बचाव पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानाने लागले. यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडुन आले, तर रंजन तावरे यांचा पराभव झाला. तसेच शरद पवार गटाला सपशेल नाकारलं असून या गटाला एकही जागा मिळालेली नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गातून स्वत:ची उमेदवारी जाहीर करुन स्वतःचेच नाव चेअरमन पदासाठी घोषित केलं होतं. त्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले. अजित पवारांनी ही निवडणुक गांभीर्याने घेत स्वत:ची रणनिती आखली. सलग ८ ते १० दिवस कारखाना कार्यक्षेत्रात तळ ठोकत सभासदांच्या गाठीभेटी घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

 Malegaon Sugar Factory Election Ajit Pawar Panel
Sunil Shelke : स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी कार्यकर्त्यांना उचकवताय; आमदार सुनील शेळके यांचा भेगडे यांच्यावर निशाणा

त्याचबरोबर सभांचा सपाटा लावत त्यांनी विरोधकांना जोरदार उत्तर त्यातून दिलं. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाची हवा आपल्या बाजूने वळवली. अजित पवार यांनी प्रभावी आणि आक्रमक प्रचार केला. यात त्यांनी अनेक आश्वसने देत विरोधकांना चीतपट केलं.

 Malegaon Sugar Factory Election Ajit Pawar Panel
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार? मराठा आरक्षणामुळे वाढणार सरकारच्या अडचणी

काय दिलेत आश्वसने

सलग पाच वर्ष राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा ऊसाला दर देणार

निवडून येणाऱ्या संचालकांना कोणतेही वाहन अथवा ड्रायव्हर मिळणार नाही.

संचालकाला कारखान्यातून एकही रुपयाचा उचल मिळणार नाही.

संचालकांना भत्ता मिळणार नाही, त्यांना फक्त चहा मिळणार

कारखान्याला राज्याचा व केंद्राचा निधी मिळवून देणार

कारखाना कार्यक्षेत्रातील रस्ते एस.आर.एस फंडातून करणार

रस्ते करण्यासाठी सभासदांचा एकही रुपया घेतला जाणार नाही

केंद्राचे व राज्याचे अनेक कारखान्याला आणण्यासाठी मदत करणार

अजित पवार यांच्या या आश्वसानांनी प्रचारात मोठा धुमाकूळ उडवून दिला. त्याचा परिणाम निकालात दिसत आहे. सभासदांनी अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत प्रचंड बहुमताने पॅनल विजयी केलं. दरम्यान मागील निवडणुकीत विरोधकांचे चार संचालक निवडून आलेले होते. त्यामध्ये स्वतः सहकारमहर्षी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्यासह ॲड.जि.बी.गावडे आणि प्रताप आटोळे यांचा समावेश होता. त्यानंतर प्रताप आटोळे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला.

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल

ब वर्ग प्रतिनिधी

अजित पवार यांना मिळालेली मते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 91

भालचंद्र देवकाते यांना मिळालेली मते (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 10

यात अजित पवार 91 मतांनी विजयी

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ

रतनकुमार साहेबराव भोसले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8670

बापूराव आप्पा गायकवाड (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7183

यात 1487 मताने रतनकुमार भोसले विजयी

इतर मागासवर्गीय प्रवर्ग

नितीन वामनराव शेंडे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8494 मते

रामचंद्र कोंडीबा नाळे (सहकार बचाव पॅनल) 7341

यात 1153 मतानी नितीन शेंडे विजयी.

भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग

विलास ऋषिकांत देवकाते(श्री निळकंठेश्वर पॅनल)

सूर्याजी तात्यासो देवकाते (सहकार बचाव शेतकरी पॅनल)

यात 2227 मतांनी विलास देवकाते विजयी

महिला राखीव मतदारसंघ

संगीता बाळासाहेब कोकरे(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8440

ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 7576

( अजित पवार गटाच्या या दोघीही महिला विजयी)

राजश्री बापूराव कोकरे(सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7485 (अवघ्या 91 मतांनी राजश्री कोकरे यांचा पराभव)

माळेगाव गट क्रमांक एक सर्वसाधारण ऊस उत्पादक

शिवराज जाधवराव (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8612

बाळासाहेब तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल)7942

राजेंद्र बुरुंगले ( श्री निळकंठेश्वर पॅनल) 8116

(वरील तीनही उमेदवार विजयी आहेत)

रंजनकुमार शंकरराव तावरे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7353

संग्रामसिंह काटे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6701

रमेश गोफणे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6302

पणदरे गट क्रमांक 2

तानाजी कोकरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8495

योगेश जगताप (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8635

स्वप्नील जगताप (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7933

(वरील तीनही उमेदवार विजयी आहेत)

रोहन कोकरे (सहकार बचाव पॅनल) 7083

रणजित जगताप (सहकार बचाव पॅनल) 6134

सत्यजित जगताप (सहकार बचाव पॅनल) 6232

सांगवी गट क्रमांक 3

गणपत खलाटे (श्री निळकंठेश्वर पॅनल)8543

चंद्रराव तावरे (सहकार बचाव पॅनल) 8163

विजय तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7882

(सांगवी गटातून सहकार बचाव पॅनलचे चंद्राराव तावरे विजयी.... तर अजित पवार गटाचे गणपत खलाटे आणि विजय तावरे विजयी झाले आहेत.)

रणजित खलाटे (सहकार बचाव पॅनल)7224

विरेंद्र तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7289

संजय खलाटे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6154

खांडज शिरवली गट क्रमांक 4

प्रताप आटोळे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8328

सतीश फाळके (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8404

(वरील दोन्ही उमेदवार अजित पवार गटाचे विजयी)

विलास सस्ते (सहकार बचाव पॅनल) 6436

पोंदकुले मेघश्याम (सहकार बचाव पॅनल) 6422

निरावागज गट क्रमांक पाच

अविनाश देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8640

जयपाल देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8051

(वरील दोन्ही उमेदवार अजित पवार गटाचे विजयी)

केशव देवकाते (सहकार बचाव पॅनल)6436

राजेश देवकाते (सहकार बचाव पॅनल)6499

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com