Malegaon : 'तू विद्यार्थ्यांचे धर्मांतर करत आहेस...'; प्राचार्यांवर आरोप करत केले निलंबन!

धर्मांतरासारख्या मुद्द्यांवरुन जातीवरून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत.
Malegaon
MalegaonSaam TV
Published On

Malegaon News: राज्यात सासत्याने लवजीहाद सारख्या घटनांमुळे धार्मीक तेढ वाढताना दिसत आहे. धर्मांतरासारख्या मुद्द्यांवरुन जातीवरून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. अशात आता एका प्राचार्यास अशाच एका कारणावरून थेट त्याच्या पदावरुन निलंबीत करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

सदर प्राचार्य एका महाविद्यालयात करिअर गायडन्ससाठी आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना इस्लामकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सेमिनरची सुरुवात एका प्रार्थनेपासून करण्यात आली. प्रार्थना इस्लामिक होती. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना इस्लामकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्राचार्यांवर करण्यात आला आहे.

Malegaon
Maharashtra Politics: 'बाळासाहेबांची शिवसेना म्हणतात, पण...'; जाहिरातीवरून छगन भुजबळांचा CM एकनाथ शिंदे यांना टोला

महाराज सयाजीराव गायकवाड आर्ट्स, सायंन्स अँड कॉमर्स कॉलेजचे संचालन शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे नेते आणि भाजपचे विधानपरिषदेचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्याकडे आहे. हिंदुत्ववादी संगटनांकडून या सेमिनारच्या आयोजनाल विरोध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना इस्लामकडे आकर्षित केलं जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मंत्री दादा भुसे यांनी देखील या प्रकरणी दखल घेतली आहे. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी दादा भुसे यांनी केली आहे.

या कॉलेजमध्ये संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयावर एक करियर गायडन्स काउंसिलिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम स्थानिक संघटना सत्य मलिक लोक सेवा समूह यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुण्यातील अनीस डिफेंस करियर इंस्टीट्यूटचे अनीस कुट्टी यांना निमंत्रण देण्यात आले होते.

Malegaon
Bihar Crime News: धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरडाओरड करताच बाहेर फेकलं, मुलीचा मृत्यू

प्राचार्यांचं म्हणण काय?

निलंबीत करण्यात आलेले प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी या प्रकरणी म्हटलं आहे की, कार्यक्रमची सुरूवात एका छोट्या इस्लामिक प्रार्थानेने करण्यात आली. विद्यार्थांना मार्गदर्शन आवडत होते. अचानक काही व्यक्ती हॉलमध्ये घुसले आणि सदर कार्यक्रम इस्लामच्या प्रचारासाठी असल्याचा दावा करु लागले. आम्ही सुरुवातीला एक एका लहान अरबी मंत्र म्हटला होता. कारण की ही संघटना त्यांच्या इतरही सर्व कार्यक्रमाची सुरूवात याच प्रकारे करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com