Chhagan Bhujbal News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. सत्ताधारी शिंदे गटाने देखील आगामी निवडणकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या एका जाहिरातीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.' ते बाळासाहेबांची शिवसेना म्हणतात, पण बाळासाहेबांचा फोटो नाही, हे आश्चर्य, असं म्हणत भुजबळांनी टीका केली आहे. (Latest Marathi News)
छगन भुजबळांनी सत्ताधाऱ्यांच्या जाहिरातीवरून चौफेर टीका केली आहे. छगन भुजबळ म्हणाले, 'मला आश्चर्य वाटतंय, नेहमी पंतप्रधान मोदी , अमित शाह आणि त्याच्या खाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांचे फोटो असायचे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकदम गायब झाले. मला आश्चर्य वाटतंय, शिंदे साहेबांची ही मोठी झेप आहे'.
'ते बाळासाहेबांची शिवसेना म्हणतात, पण बाळासाहेबांचा फोटो नाही, हे आश्चर्य. फडणवीसांना ते विसरले तर विसरू द्या. पण बाळासाहेबांना तर निदान विसरता कामा नये. मला माहीत नाही, सर्व्हेची आकडेवारी कुणी काढली, असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला.
लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात हेवे-दावे सुरू झाले आहे. यावरून देखील भुजबळांनी टीकास्त्र सोडलं आहे. 'लोकसभेच्या जागेवरील वाद उघड नसला तरी मन दुखावले जातात. कल्याण लोकसभेचा वाद उघड्यावर होत आहे. पण ते सावरण्यासारखे आहे. पण असं जेव्हा होतं, त्यावेळी हा विषय कार्यकर्ते, सामान्य लोक यांच्यापर्यंत जातो. यामुळे मनातली एकता कमी होते,असे भुजबळ म्हणाले.
'माझा जरी एखादा फोटो नसला, तरी मला वाटतं, माझा फोटो का नाही? कार्यकर्ते ताबडतोब म्हणतात, साहेब तुमचा फोटो नाही. पाच पन्नास लाखांची जाहिरात झाली असेल, सर्व वर्तमानपत्रांत जाहिरात पाहिली. अर्थात मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री असल्यामुळे 50 लाख काय जास्त वाटत नाही, असेही भुजबळ पुढे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.