Bihar Crime News: धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरडाओरड करताच बाहेर फेकलं, मुलीचा मृत्यू

बिहारच्या गयामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे
Crime News
Crime NewsSaam TV
Published On

Bihar Crime News Today: बिहारमध्ये बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता बिहारच्या गयामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गया येथे एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. तिने विरोध केल्यावर दोघांनी तिला धावत्या ऑटोतून बाहेर फेकून दिले.  (Latest Marathi News)

Crime News
Cyclone Biparjoy: 'बिपरजॉय' 15 जूनला गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता; सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी

टनकुप्पा पोलीस (Police) स्टेशन हद्दीतील बारा गावाजवळील शिव मंदिराजवळ ही घटना घडली. ही घटना रविवारी (11 जून) रात्री उशिरा घडली आहे. जखमी अवस्थेत मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी (12 जून) तिचा मृत्यू झाला.

नेमकं प्रकरण काय?

रविवारी दुपारी एक ऑटोचालक आणि त्याच्या साथीदाराने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. मुलीने आरडाओरड करताच या नराधमांनी तिला धावत्या रिक्षामधून खाली फेकले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान सोमवारी तिचा मृत्यू झाला. (Crime News)

Crime News
Maharashtra Politics: राऊत,राणे अन् फडणवीस रोज एकमेकांची अब्रू काढतात; यातून सामान्यांचे हिताचे काय? वळसेपाटलांचा सवाल

पीडितेने आरडाओरड करताच गावकऱ्यांनी केला पाठलाग

टनकुप्पा पोलीस स्टेशन हद्दीतील बरतारा मार्केट येथून रविवारी एका रिक्षाचालकाने १५ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने रिक्षात बसवले. ऑटोचालकासोबत आणखी एक साथीदार त्याच्यासोबत रिक्षात होता. यावेळी मुलीने विरोध केला आणि आरडाओरडा सुरू केला. (Bihar Crime News)

मुलगी आवाज करत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर गावकरी आपला पाठलाग करत असल्याचे पाहून रिक्षाचालकाने धावत्या रिक्षातून मुलीला बाहेर फेकले. ग्रामस्थांनी ऑटोचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com