Maharashtra Politics: राऊत,राणे अन् फडणवीस रोज एकमेकांची अब्रू काढतात; यातून सामान्यांचे हिताचे काय? वळसेपाटलांचा सवाल

Dilip Walse Patil News: वळसेपाटील आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील दौऱ्यावर असताना बोलत होते.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSaam TV

Political News Today: दिवसाची सुरुवात करताना सकाळी टिव्ही लावला की एका बाजुने संजय राऊत तर दुसऱ्या बाजुला नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांची अब्रूच काढताना दिसतात असं म्हणत माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटलांनी राऊतांसह राणे फडणवीसांना खडेबोल सुनावलेत. (Latest Marathi News)

Dilip Walse Patil
Bhopal fire News: भोपाळमध्ये सातपुडा भवनाला भीषण आग! नियंत्रण मिळवण्यासाठी थेट लष्कराला बोलवलं

रोज सकाळी एकमेकांची अब्रू काढणारे सामान्य लोकांच्या अडचणीवर बोलत नाहीत तर त्यांना एकमेकांच्या आब्रु काढण्यापलीकडे काहीच करत नाही यातून सामान्य जनतेचे कल्याण काय होणार असा खडा सवालच वळसेपाटलांनी भर सभेत मांडला. वळसेपाटील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील आदिवासी भागातील दौऱ्यावर असताना बोलत होते.

औरंगजेबच्या फोटोचे स्टेटस ठेवल्याच्या छोट्या गोष्टींनी दंगली व्हायला लागल्या आणि त्या दंगलीला सरकारचे संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटीलांनी (Dilip Walse Patil) केला आहे. (Political News)

Dilip Walse Patil
Pune News: पुणे शहराची डिजिटल क्षेत्रात प्रगती; नव्या सामर्थ्याचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनाचं उद्घाटन

तर पुढे लव जिहाद या प्रकरणावर बोलताना वळसेपाटील म्हणाले की, लव जिहादच्या नावाखाली हिंदु विरुद्ध मुसलमान,दलित विरुद्ध इतर असे वाद लावून त्यांची विभागानी करण्याचे कारास्थान सुरु असल्याची गंभीर आरोप गृहमंत्री दिलीप वळसेपाटलांनी केला आहे.

प्रेम विवाहतून हिंदु मुस्लिम मुल मुलीचे विवाह होतात. यामध्ये वय मर्यादा योग्य असेल तर तक्रार असण्याचे कारण नाही. पण जबरदस्तीने धर्मांत्तर करायला लावल्याच्या तक्रारी आल्या की वाद होत असल्याचे मतही वळसेपाटीलांनी व्यक्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com