Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

Maharashtra political News : भाजपने शरद पवार यांना मोठा धक्का दिलाय.अहिल्यानगरमधील पक्षाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री केली आहे.
Maharashtra political
Maharashtra political News Saam tv
Published On

भाजपकडून आज मंगळवारी शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील शरद पवार गटातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांचं भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वागत केलं.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यभरात जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने अहिल्यानगरमध्येही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अहिल्यानगरमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

कुणी केला भाजपमध्ये प्रवेश?

अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाषराव काळाने, माजी सरपंच बेलवंडी, बेलवंडी व्यापारी पतसंस्था चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार - उत्तमराव डाके, तांदळी दुमालाचे सरपंच, उद्योजक संजय निगडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांनी रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार विक्रमसिंह पाचपुते, भाजपा तालुकाध्यक्ष विक्रम भोसले, शहर अध्यक्ष धनराज कोथिंबीरे यावेळी उपस्थित होते.

मढेवडगाव सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुदेश (बंडू) मांडे यांच्यासोबत तांदळी दुमाला येथील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजप प्रवेश केला. यामध्ये माजी सरपंच देविदास भोस, विद्यमान उपसरपंच संतोष हराळ, माजी उपसरपंच तुषार धावडे तसेच ग्रामपंचायत सदस्य रामदास गंगाधरे, नरसिंग भोस, झुंबर खरांगे, संतोष बोरुडे, तांदळेश्वर सोसायटीचे माजी संचालक प्रवीण काळेवाघ, जयसिंग भोस, कुंडलिक काळेवाघ, दगडू काळेवाघ आदींचा समावेश आहे.

भाजपचा ठाकरेंना हादरा

चंद्रपुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार करण देवतळे उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत रवींद्र शिंदे बिनविरोध निवडून आले. या बँकेवर अध्यक्ष म्हणून विराजमान होण्यासाठी त्यांनी हा भाजप प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com