लोकसभेची रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार आहे. या जागेविषयी अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केलीय. म्हसळा येथील मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जागेचा निर्वाळा केलाय. सुनील तटकरे यांनाच रायगडची उमेदवारी देणार अजित पवार यांचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अजित पवार यांच्या वक्तव्याने वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. (Latest News)
रायगडच्या जागेवरून सध्या राष्ट्रवादी भाजपमध्ये सुरू होता वाद. भाजपकडून केला जात होता दावा. इतकेच नाही तर शिंदे गटाने देखील या जागेवर आपला दावा केला होता. रायगड लोकसभा मतदारसंघावर तिन्ही घटक पक्षांनी दावा केल्याने हा पेटणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे महायुतीचा वाद मिटणार की वाद पेटणार असा प्रश्न केला जात आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रायगडच्या लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मध्ये सुरू असलेल्या वादाला आता पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे. रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. म्हसळा येथील पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनाच उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिलेत. रायगडच्या जागेवर भाजपने दावा केला आहे आणि त्यासाठी विशेष मोहीम भाजपकडून राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे विधान महत्वपूर्ण आहे.
शिवसेनेचा शिंदेगटही या मतदारसंघासाठी आग्रही आहे. अलिबाग येथील ग्रामपंचायत निवडणुकांनंतर झालेल्या पक्षपदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेनेनी रायगडची लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केली. त्याला स्थानिक पदाधिकारी देखील दुजोरा दिलीय. शिवसेनेचे अनंत गीते या मतदारसंघातून निवडणूक लढवत आलेत. मतदारसंघात शिवसेनेचे सर्वाधिक विधानसभेचे आमदार आहेत. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेनी या मतदारसंघाची निवडणूक लढवावी अशी रास्त भूमिका पक्षाकडून मांडली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.