Mahayuti Press Conference : मेळावे, पक्षप्रवेश, बैठका...महाराष्ट्रात महायुतीचा मोठा प्लान ठरला!

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
Mahayuti Press Conference
Mahayuti Press ConferenceSAAM TV
Published On

Mahayuti For Loksabha Election 2024 :

भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेतृत्वात महायुतीने आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने संपूर्ण तयारी केली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीत मेळावे, पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होणार असून, लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत महायुतीच्या नेत्यांनी आगामी काळातील संपूर्ण योजना स्पष्ट केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महायुतीची आज, बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. या परिषदेला महायुतीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि दादा भुसे उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महायुतीने नेमकी काय तयारी केली आहे, याबाबत नेत्यांनी सविस्तर माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणाले की, नव्या वर्षात महायुतीची पत्रकार परिषद होत आहे. आजचा हेतू हाच आहे की, महायुती म्हणून आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे. जानेवारीपासून महायुतीचे मेळावे होतील. त्यात एक हजार प्रमुख कार्यकर्ते किंवा त्यापेक्षा जास्त संख्या असेल. (Latest Marathi News)

Mahayuti Press Conference
Sanjay Raut: 'महानंद डेअरी गुजरातला पळवण्याचा डाव, ठाकरे गट गप्प बसणार नाही..' संजय राऊतांचा सरकारला इशारा

दादा भुसे म्हणाले की, तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी बावनकुळे यांनी महायुतीच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. या महिन्याापासूनच महायुतीचे मेळावे घेणार आहोत. आगामी निवडणुकीला आम्ही एकत्र सामोरे जाणार असून, १४ जानेवारीला सर्व जिल्ह्यांत मेळावे होतील, असे बावनकुळे म्हणाले. (Political News)

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार आणि फडणवीसांच्या उपस्थितीत मेळावे

राज्य पातळीवर एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये जे निर्णय झाले आहेत, ते सर्व निर्णय तळागाळात पोहोचवण्याचा उद्देश आहे. फेब्रुवारीपर्यंत सर्व मेळावे घेण्यात येतील. हे मेळावे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.

महायुतीतील ११ पक्षही मेळाव्यात होणार सहभागी

महायुतीतील अकरा पक्षांचे नेतेही या मेळाव्यांमध्ये सहभागी होतील. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि बूथ पातळीवरही मेळावे घेण्यात येणार आहेत. जानेवारीपर्यंत जिल्हास्तरीय, फेब्रुवारीपर्यंत विभागीय स्तरावरील मेळावे होतील. शिंदे-पवार-फडणवीस यांच्या उपस्थितीत हे मेळावे घेण्यात येतील. घटकपक्षांचे नेतेही उपस्थित राहतील. मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात एक प्रचंड मोठे यश महायुतीला मिळेल. महायुतीने जी तयारी केली आहे, ते बघता ४५ हून अधिक जागा महाराष्ट्रात जिंकणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Mahayuti Press Conference
Devendra Fadnavis: मी राम मंदिरासाठी बदायूच्या जेलमध्ये होतो; देवेंद्र फडणवीसांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

मोदींच्या नावाचं वादळ महाराष्ट्रात येईल, तसं महायुतीकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाचे कार्यक्रमही होतील. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपकडेही रोजच पक्षप्रवेश होत आहेत, असेही ते म्हणाले. आम्ही सर्व पक्षाचे लोक आपापल्या स्तरावर बूथस्तरापर्यंत पक्षबांधणी पूर्ण करणार आहोत. मला असं वाटतं की महायुती प्रचंड ताकदीने महाआघाडीला पराभूत करेल. ४५ खासदार हात उंचावून उभे असतील अशी रचना आम्ही केली आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com