सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांनी 301 मतांनी विजय मिळवला. मात्र, या विजयाच्या जल्लोषामागे महायुतीसाठी एक धोक्याची घंटा समोर आलीय... कागदावर बहुमतात असलेल्या महायुतीची तब्बल 75 ते 80 मतं फुटल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय..दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना अपेक्षेपेक्षा 99 मते अधिक मिळाली आहेत. त्यामुळे भाजपनं विजय मिळवला असला तरी या अंतर्गत फुटीमुळे महाय़ुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलीय...
सांगली आणि सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीत 894 मतदार आहेत... मात्र 9 मतं अवैध ठरल्यानं मतांचा आकडा 885 झाला...यात महायुतीला 650 तर मविआला 193 मतं मिळणं अपेक्षित होतं... मात्र निवडणुकीनंतर महायुतीचे उमेदवार 593 मतं मिळाल्याचा आणि मविआचे अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाल्याचं समोर आलं...ज्यामुळे मविआला अपेक्षित मतदानापेक्षा 99 मतं जास्त मिळाली... तर महायुतीला अपेक्षित मतांपेक्षा 57 मतं कमी मिळाल्याचं समोर आलयं... तर अपक्ष उमेदवारांना 52 मतं मिळालेत...
दरम्यान मविआतल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंह जगपात य़ांनी महायुतीची 100 मतं फुटल्याचा दावा केलाय.. तर महायुतीच्या विजयी उमेदवारांनी मतं फुटल्याचा दावा फेटाळून लावलाय...
मुळात सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जे वाद आणि 'राडा' झाला होता, त्याचा थेट फटका या निवडणुकीत बसल्याचं दिसतंय.... कारण साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिंदेसेनेचे नेते यांनी मतदानाच्या आधीच नाराजीचा सूर आळवला होता...
स्थानिक पातळीवरील ईर्ष्या आणि हेवेदावे वरिष्ठ नेत्यांना मिटवता आले नाहीत. तसंच दादांच्या राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी 'तटस्थ' राहण्याची भूमिका घेतल्यानं ही नाराजी मतपेटीतून बाहेर पडलीय...मात्र धैर्यशील कदम यांच्या विजयामुळे भाजपची विधान परिषदेची जागा सुरक्षित राहिली असली, तरी 75 ते 80 मतांची झालेली फूट महायुतीच्या आत्मपरीक्षणाची वेळ आणणारी आहे. त्यामुळे जागावाटप आणि स्थानिक वाद वेळेत न मिटवल्यास महायुतीला आगामी काळात मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते, हेच या निकालाने अधोरेखित केलयं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.