Maharashtra Politics: सरकारचं खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं तर अजित पवारांकडे अर्थखातं

Mahayuti Government Ministry Allocation: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज जाहीर करण्यात आले आहे.
Mahayuti
Mahayuti GovernmentOne India
Published On

महायुती सरकारचं खातेवाटप झालं आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थखातं देण्यात आलंय. तर ज्या खात्यावरून म्हणजेच गृह खात्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. हे खातं अखेर भाजपकडे गेले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना गृहमंत्रीपद मिळालंय. अधिवेशन संपल्यानतंर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आज रात्रीच खातेवाटप होणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर खातेवाटप जाहीर झालंय.

सहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर महायुती सरकारचं खातेवाटप करण्यात आलंय. यात काही मंत्र्यांच्या खातेबदल करण्यात आले आहेत तर काही मंत्र्यांना तेच खाते देण्यात आली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या खात्यासाठी शिवसेना आग्रही होते, ते खातं त्यांना देण्यात आले नाहीये. गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे. मात्र त्याच बाजुला अजित पवार यांचा हट्ट महायुतीने पूर्ण करत त्यांच्याकडे अर्थखातं देण्यात आलंय.

असे आहे खातेवाटप

देवेंद्र फडणवीस - गृहमंत्रीपद, ऊर्जा खातं

अजित पवार - अर्थखातं

एकनाथ शिंदे- नगरविकास आणि गृहनिर्माण खातं

चंद्रकातं पाटील- उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण खातं

पंकजा मुंडे : पशुसंवर्धन आणि पर्यावरण

अशोक उईके - आदिवासी विकास

भरत गोगावले- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

गिरीश महाजन - जलसंपदा खातं (विदर्भ, तापी, कोकण)

धनंजय मुंडे- अन्न, नागरी पुरवठा

गणेश नाईक- वनमंत्री

गुलाबराव पाटील -पाणीपुरवठा

दादा भुसे- शालेय शिक्षण खातं

प्रताप सरनाईक- परिवहन खातं

बाबासाहेब पाटील- सहकार खातं

संजय राठोड- माती आणि पाणी संवर्धन खातं

संजय शिरसाट - सामाजिक न्याय विभाग

आकाश पुंडकर- कामगार मंत्रालय

शंभुराज देसाई - पर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

चंदशेखर बावनकुळे- महसूल खातं

आतुल सावे- ओबीसी विकास मंत्री

माणिकराव कोकाटे- कृषी खातं

मंगलप्रभात लोढा-

दत्ता भरणे- क्रीडा, युवक मंत्रालय

हसन मुश्रीफ- वैद्यकीय शिक्षण

राधाकृष्ण विखे-पाटील- जलसंपदा मंत्री

उदय सामंत - उद्योग मंत्री व मराठी भाषा

जयकुमार गोरे : ग्रामविकास आणि पंचायत राज

नरहरी झिरवाळ- औषध

नितेश राणे- मत्स आणि बंदर विकास मंत्रालय

Mahayuti
Winter Session: 2024 मध्ये सगळे बॅट्समन मैदानात उतरवले अन् चॅम्पियन ठरलो; फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

आशिष शेलार : माहिती व तंत्रज्ञान

दत्तात्रय भरणे : क्रीडा व अल्पसंख्याक विकास

अदिती तटकरे : महिला व बालविकास

शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम

मकरंद पाटील : मदत व पुनर्वसन

प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण

जयकुमार रावल : विपणन

अदिती तटकरे : महिला व बालविकास

Mahayuti
Chief Minister: हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर, मांडला सर्वांगीण, विकसित महाराष्ट्राचा आराखडा: मुख्यमंत्री फडणवीस

राज्यमंत्र्यांकडे कोणतं खातं?

माधुरी मिसाळ -सामाजिक न्याय,अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण

योगेश कदम - गृह राज्य शहर

पंकज भोयर - गृह निर्माण

आशिष जयस्वाल -अर्थ आणि नियोजन आणि विधी व न्याय

इंद्रनील नाईक -उच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास

मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com