Mahashivrtari 2024 : वाह रे पठ्ठ्या! वैकुंठ धामच्या भिंतीवर रेखाटले भोलेनाथ; स्मशानभूमीतील फोटो व्हायरल

Bholenath Painted On Wall Crematorium : बारावीपर्यंत त्याने कला शाखेत शिक्षण घेतलंय. त्याला पुढे आणखी शिकायचे होते. मात्र परिस्थिती हालाखीची असल्याने त्याला पुढे शिक्षण घेता आले नाही.
Mahashivrtari 2024
Mahashivrtari 2024 Saam TV
Published On

महेंद्र वानखेडे

Vasai Virar News :

वसई विरार महानगर पालिकेच्या नाळे गावातील वैकुंठधामच्या भिंतीवर भगवान शंकराचे चित्र रेखाटण्यात आले आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त सध्या या वैकुंठधामाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच येथील काही व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होत आहेत.

Mahashivrtari 2024
Vasai-Virar News : ती २९ गावे वसई विरार महानगरपालिकेतच राहणार; उच्च न्यायालयाकडून याचिका निकाली

नाळे गावातील वैकुंठधामच्या भिंतीवर तेथेच काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने भगवान शंकराचे चित्र रेखाटले आहे. देवधर भोईर असं या कर्मचाऱ्याचे नाव आहे. देवधर नवापूर गावातील स्थानिक रहिवासी आहे. बारावीपर्यंत त्याने कला शाखेत शिक्षण घेतलंय. त्याला पुढे आणखी शिकायचे होते. मात्र परिस्थिती हालाखीची असल्याने त्याला पुढे शिक्षण घेता आले नाही.

असे असले तरी त्याच्या हातातली कला कधीच लपली नाही. एक कलाकार आणि त्याच्यामध्ये असलेली कला फार काळ लपून राहत नाही. हाती कला असलेल्या देवधरला या स्मशानाच्या रूक्ष भिंतींमध्येही देव दिसला. त्याने हाती रंग व कुंचला घेऊन थेट शिव शंकराची अप्रतीम अशी कलाकृती साकारली आहे.

पालिकेच्या कंत्राटी कामगारांमध्ये असे आज अनेक कामगार आहेत त्यांच्या या गुणांची पालिका अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कामासोबत त्यांची कला ही जनतेसमोर आणण्याची संधी द्यावी,अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तरुणाने रेखाटलेलं शंकाराचं चित्र पाहून येथे आलेल्या सर्वच व्यक्ती प्रसन्न झाल्या. या तरुणाच्या कलेचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.

Mahashivrtari 2024
Mulshi Crime: मुलीच्या लग्नासाठी ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, तब्बल साडे ७ लाखांचा ऐवज लंपास; मुळशीत खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com