Pandharpur News: स्मशानातून होतेयं मृत व्यक्तीच्या राखेची चोरी! विचित्र प्रकाराने पंढरपुरात खळबळ; धक्कादायक कारण समोर

Pandharpur Latest News: या घटनेमुळे तिसर्‍या दिवशीच्या विधीसाठी मृताच्या अस्थी कोठून आणायच्या? कसे पूजन करावयाचे?असा प्रश्न मृतांच्या नातेवाईकांसमोर उभा राहिला आहे.
Pandharpur Crime
Pandharpur CrimeSaamtv
Published On

Pandharpur Crime News: पंढरपूर येथील स्मशानभूमीतून मृत व्यक्तीची राख चोरल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वारंवार अशा घटना समोर येत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच सोन्याच्या हव्यासापोटी अशा घटना घडत असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. (Crime News In Marathi)

Pandharpur Crime
Sangli Crime: सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत २३ घरे फोडली; शिराळा तालुक्यात खळबळ

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर (Pandharpur) शहरातील रहिवासी सौ. प्रभावती रामचंद्र कोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. समस्त कोरे परिवाराने त्यांच्यावर येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार झालेल्या महिलेची राख (अस्थी) कोणीतरी अज्ञात व्यक्तिने चोरून नेली असल्याचे निदर्शनास आले. मृत व्यक्तीच्या अंगावरील सोने मिळवण्याच्या हव्यासापोटी अशा घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे.

Pandharpur Crime
Bengaluru Flight News: विमानानं टेक ऑफ केल्यानंतर प्रवाशानं इमर्जन्सी डोअर उघडण्याचा केला प्रयत्न; बेंगळुरूत काळजात धडकी भरवणारी घटना

या घटनेमुळे तिसर्‍या दिवशीच्या विधीसाठी मृताच्या अस्थी कोठून आणायच्या? कसे पूजन करावयाचे? हा गंभीर प्रश्न कोरे परिवारासमोर उभा राहिला आहे. पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे; अन्यथा मृत व्यक्तिचा तिसऱ्याचा विधी नगरपालिकेच्या केला जाईल असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com