Lok Sabha 2024: अजय बोरस्ते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये खलबतं; नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

Maharshtra Politics Nashik Lok Sabha Costituency: नाशिक लोकसभा जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. मध्यरात्री नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
Maharshtra Politics
Nashik Lok Sabha CostituencySaam Tv

विकास काटे साम टीव्ही, ठाणे

नाशिक लोकसभा जागेचा (Nashik Lok Sabha Costituency) तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. मध्यरात्री नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. नाशिकच्या जागेसाठी बोरस्ते (Lok Sabha 2024) यांना उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी शिवसैनिकांची आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा महायुतीमधील तिढा अजून सुटलेला नाही.

नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते ( (Ajay Boraste) यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या चैत्र नवरात्रीच्या देवीचे दर्शन घेतले. त्यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट (Nashik Lok Sabha) घेतली. मात्र सगळ्यांचं लक्ष त्यांच्यामध्ये चर्चा काय झाली, याकडे लागलं आहे. नाशिक लोकसभा जागेचा तिढा सुटला नाहीये.

एकीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे (Maharshtra Politics) अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या अगोदर वर्षा आणि ठाण्यातील निवासस्थानी गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन केले होतं. मात्र, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची मध्यरात्री भेट (Ajay Boraste Meet CM Eknath Shinde) झाली. मुख्यमंत्री आणि बोरस्ते याच्यांमध्ये काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

निवडणूक तोंडावर आलीय तरी (Lok Sabha) अजून महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. नाशिक लोकसभा जागेवरून अजूनही महायुतीमध्ये रस्सीखेच सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी (Maharashtra Politics) तिन्ही पक्ष आग्रही असल्याचं दिसत आहे.

Maharshtra Politics
Nashik Lok Sabha Election: नाशिकच्या जागेचा तिढा सुटला? पवार-फडणवीसांमध्ये सव्वा तास चर्चा, पेच सुटला?

नाशिकमध्ये विद्यमान स्थितीमध्ये हेमंत गोडसे शिंदे गटाचे खासदार (Maharshtra Election) आहेत. या जागेसाठी अजय बोरस्ते देखील इच्छूक आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा घोळ अजून देखील मिटलेला नाही. नाशिकच्या जागेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आग्रही (Lok Sabha 2024) असल्याचं दिसतंय.

Maharshtra Politics
Nashik Loksabha: महायुतीत नाशिकचा तिढा सुटणार! हेमंत गोडसे, भुजबळांऐवजी नव्या नावाची चर्चा; कोण आहेत अजय बोरस्ते?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com