Rain Update : गणरायाला निरोप देण्यासाठी पाऊस हजेरी लावणार, 'या' २१ जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update Today News : महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून २१ जिल्ह्यांना यलो अलर्ट तर चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जाणून घ्या आजचा पावसाचा अंदाज.
Maharashtra Heavy Rain Ganpati Visarjan
Maharashtra Heavy Rain Ganpati Visarjan AI Image
Published On: 

गणरायाला निरोप देण्याची तयारी सुरू असतानाच राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आज राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून, विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील तब्बल २१ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra Heavy Rain Ganpati Visarjan
Egg Yolk : अंड्याचा पिवळा बलक खाल्ल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक? नेमकं सत्य काय? जाणून घ्या

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Heavy Rain Ganpati Visarjan
Accident News : मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात! कारची ट्रेलरला जोरदार धडक; मंत्र्याच्या मुलीसह ४ जणांचा जागीच मृत्यू

दरम्यान, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर राहण्याची शक्यता असून, येथे जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे . बंगालच्या उपसागरातील बदलत्या हवामानाचा प्रभाव पुढील काही दिवस महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पावसाची स्थिती कायम राहू शकते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com