राज्यामध्ये सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये ऊन पडताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला होता. पण आता पाऊस कमी झाला आहे. राज्यामध्ये सध्या हवामान विसंगत राहते. राज्यामध्ये आज पावसाची काय परिस्थिती आहे आणि हवामान कसे राहिल हे आपण जाणून घेणार आहोत...
हवामान खात्याने महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पण राज्यात पावसाची तीव्रता कमी झाली आहे. राज्याचे हवामान विसंगत राहते. काही भागांमध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस पडतो आणि काही भागात सूर्यप्रकाश पडतो. पुढील २४ तासांमध्ये अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलका पाऊस आणि अधूनमधून सूर्यप्रकाश राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या पश्चिम भागात विशेषतः डोंगराळ भागात दमदार पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट आणि दक्षिण कोकणच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकूण पावसाचे स्वरूप गुजरातमधील कमी दाब क्षेत्राच्या पुढील परिस्थितीवर अवलंबून असू शकते. हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की, राज्यात पुढील काही दिवस अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. सध्या पावसात सतत चढ-उतार होत आहे.
दरम्यान, सध्या केरळ आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरातमध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. यामुळे काही राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून १५००० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसंच, बंगालच्या उपसागरावर एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यात आहे. त्यामुळे भारताच्या पूर्वेकडील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.