Maharashtra Weather Update: मुंबईची हवा सुधारली, राज्यात थंडीची चाहूल; वाचा हवामानाचा अंदाज

Weather Department: राज्यातील हवामान पुढचे काही दिवस कोरडे राहिल. तर पुढील ४ दिवस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update: मुंबईची हवा सुधारली, राज्यात थंडीची चाहूल; वाचा हवामानाचा अंदाज
Maharashtra WeatherSaam Tv
Published On

राज्यामध्ये थंडीची चाहूल लागली आहे. हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. पहाटे आणि रात्री थंडी सुरू झाली आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक थंडीची वाट पाहत होते. पण यंदा उशिराने थंडी सुरू झाली. मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी थंडी सुरू झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील हवामान पुढचे काही दिवस कोरडे राहिल. तर पुढील ४ दिवस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने सांगितले. मराठवाडा आणि विदर्भात तापमानात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दबाव वाढला आहे. याचा परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळणार आहे. आधीच सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दक्षिण भारतात पाऊस आणि उत्तर भारतात कडाक्याची थंडी अशी स्थिती आहे. अशामध्ये आता चक्रीवादळ निर्माण होणार असल्यामुळे पुढच्या २४ ते ४८ तासांत वातावरणामध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update: मुंबईची हवा सुधारली, राज्यात थंडीची चाहूल; वाचा हवामानाचा अंदाज
Maharashtra Election : अचानक उमेदवारी माघारी, आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, किशनचंद तनवाणी यांचा उद्धवसेनेला धक्का

राज्यामध्ये शनिवारी रात्रीपासूनच तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या सुमारास थंडी जाणवत आहे. सध्या, राज्यातील इतर ठिकाणाप्रमाणेच मुंबई, ठाणे आणि उपनगरात वातावरणात गारवा जाणवत आहे. मुंबईकरांना थोडीका होईना थंडी अनुभवायला मिळत आहे. तर राज्यातील सांगली, नाशिक, नागपूर आणि जळगावमधील ग्रामीण भागात तापमानात २ ते ४ अंश डिग्री सेल्सियसने घट झाली आहे. त्यामुळे थंडी वाढली आहे.

Maharashtra Weather Update: मुंबईची हवा सुधारली, राज्यात थंडीची चाहूल; वाचा हवामानाचा अंदाज
Mumbai Crime: धक्कदायक! आईच्या अफेअरबद्दल समजलं, १४ वर्षाच्या पोराला राग अनावर, चाकूने वार करत घेतला जीव!

राज्यातील निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यामध्ये १५ नोव्हेंबरनंतर थंडी वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील नागरिकांना थंडीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत थंडीचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या कोकणामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे आणि स्वच्छ आहे. पण उकाड्याने कोकणकर हैराण झाले आहेत.

Maharashtra Weather Update: मुंबईची हवा सुधारली, राज्यात थंडीची चाहूल; वाचा हवामानाचा अंदाज
Mumbai News: गोरेगावमध्ये टेम्पोत मोठा स्फोट, एकाचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com