Maharashtra Weather Alert: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! राज्यात ३ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा; काही भागात पाऊस कोसळणार

Maharashtra Weather Alert: राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळणार आहे
Maharashtra Weather Update
Maharashtra Weather UpdateSaam Tv

Mumbai News: राज्यात काही ठिकाणी नागरिकांना प्रचंड उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. तर काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहे. अशातच राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळणार आहे. तर काही भागात नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मोसमी पाऊस राज्यात दाखल होईपर्यंत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागणार आहे. समुद्रनकिनारा नजीक असलेल्या भागातील नागरिकांना हवेत आर्द्रतेचं प्रमाण असल्यामुळे उकाडा जास्त प्रमाणात जाणवत आहे.

Maharashtra Weather Update
Raigad News: शिवराज्याभिषेक सोहळ्यात घडली दु:खद घटना; रायगड किल्ल्यावर आलेल्या शिवप्रेमी तरुणाचा मृत्यू

अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यात बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे दुपारनंतर ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उष्णतेत वाढ झाल्यामुळे काही ठिकाणी वादळासह पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Maharashra Weather Update
Maharashra Weather Update Saam tv

राज्यात कुठे पाऊस कोसळणार?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, सोलापूरमधील नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहे .

Maharashtra Weather Update
Bhayandar Crime News :समुद्रकिनारी बॅगेत सापडला महिलेचा शिर नसलेला मृतदेह; हातावर त्रिशूल टॅटू

मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार (Weather Updates) येत्या १ जून रोजी मान्सून (Monsoon Update) केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहचू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com