Maharashtra Weather: दिवाळीवर पावसाचे सावट! कोकण- मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कोसळणार, १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट

IMD Rain Alert in Maharashtra: राज्यात ऐन दिवाळीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे ४ दिवस राज्यासाठी महत्वाचे असणार आहे. अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather: दिवाळीवर पावसाचे सावट! कोकण- मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कोसळणार, १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट
IMD Rain Alert in MaharashtraSaam TV
Published On

Summary -

  • महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला

  • कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पाऊस पडण्याचा अंदाज

  • बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक हवामान तयार झाले

  • १६ ते २० ऑक्टोबर या दरम्यान दिवाळीत पावसाचे सावट आहे

मान्सूनने काही भाग वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून माघार घेतल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. पण काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान पाहायला मिळत आहे. आज कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. याठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून येलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरीत राज्यात उन्हाचे चटके जास्त जाणवतील. त्याचसोबत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यामुळे लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पहाटे गारवा आणि नंतर उन्हाचा चटका असे वातावरण पाहायला मिळत आहे.

Maharashtra Weather: दिवाळीवर पावसाचे सावट! कोकण- मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कोसळणार, १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट
Maharashtra Rain: परतीच्या पावसाचा हाहाकार! आज पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

राज्यामध्ये सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशत: ढगाळ वातावरण, उन्हाचे चटके आणि उकाडा जाणवत आहे. काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणं देखील कठीण झाले आहे. मुंबईमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात बुधवारी २२.२ अंश सेल्सिअस किमान, तर ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

Maharashtra Weather: दिवाळीवर पावसाचे सावट! कोकण- मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कोसळणार, १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट
Maharashtra Rain Alert : राज्यातील काही जिल्ह्यांना यल्लो अलर्ट, जाणून घ्या कुठे कसा पडणार पाऊस

दरम्यान, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात बुधवारी जोरदार पाऊस झाला. गुरुवारीही तशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर पुढील चार दिवस राज्यात बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Weather: दिवाळीवर पावसाचे सावट! कोकण- मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कोसळणार, १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट
Kokan Rain Alert : कोकणात पावसाची दमदार बॅटिंग, हवामान खात्याचा यलो अलर्ट; पुढील दोन दिवस वातावरण कसं राहील?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com