Maharashtra : अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले; बस चालक अन् कंडक्टर निलंबित

Maharashtra News : रोहा येथे रात्रीच्या वेळी दोन अल्पवयीन मुलींना एसटी बसमधून अंधारात उतरवल्याप्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली. भंडारा आगाराचे चालक आणि वाहक निलंबित.
Maharashtra News
Maharashtra NewsAI Image
Published On: 

एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावर उतरवणे चालक आणि वाहकाला चांगलेच महागात पडले आहे. या गंभीर प्रकाराची राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित बसचालक आणि कंडक्टरला निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी भंडारा आगाराची एसटी बस प्रवास करत होती. या बसमधून दोन अल्पवयीन मुली प्रवास करत होत्या. मात्र, रोहा येथे रात्रीच्या वेळी या दोन्ही मुलींना अंधारातच बसमधून खाली उतरवण्यात आले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांनी याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या. तसेच समाजमाध्यमांवरही या घटनेची चर्चा सुरू झाली. त्यामुळे एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला.

Maharashtra News
Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं २,२०० रुपयांनी तर चांदी ८ हजारांनी स्वस्त

या प्रकाराची माहिती मिळताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानंतर भंडारा विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक यांनी प्राथमिक चौकशी केली. या चौकशीनंतर चालक अनिल सावरे आणि कंडक्टर उदेभान मेश्राम यांना १६ नोव्हेंबर २०२६ पासून निलंबित करण्यात आले आहे.

Maharashtra News
RBI Bank : RBI चा फायनान्स कंपन्यांना मोठा दणका; ६३ कंपन्यांचे परवाने रद्द

दरम्यान, भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. शालेय विद्यार्थी आणि अल्पवयीन मुलांच्या प्रवासादरम्यान त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनी पार पाडावी, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही परिवहन मंत्र्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.