Solapur News: मोठा निर्णय! संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना दिलासा

Maharashtra Drought 2023 : लोकप्रतिनिधींची वाढती मागणी लक्षात घेऊन आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
Drought In Solapur
Drought In Solapur Saam tv
Published On

Solapur Drought 2023:

यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरी ७० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. पीक सर्व्हेनंतर राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. लोकप्रतिनिधींची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने उर्वरित सहा तालुक्यातही दुष्काळ जाहीर केला आहे.

यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने अनेक भागात दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) पाच तालुक्यांचा समावेश होता. मात्र लोकप्रतिनिधींची वाढती मागणी लक्षात घेऊन आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नियमानुसार शासनाकडून आठ सवलती मिळणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरासरी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या तालुक्यांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Drought In Solapur
Diwali Pahat 2023: राज्यात सर्वत्र दिवाळी पहाट कार्यक्रमांची धामधूम; सुरांची मेजवानी ऐकण्यासाठी रसिकांची गर्दी

जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा या तालुक्यात यापूर्वीच दुष्काळ जाहीर झाला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यामुळे राज्य शासनाने उर्वरित सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

यासाठी लोकप्रतिनिधींचा दबाव वाढत होता. या पार्श्वभूमीवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन लाखो शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापुर,पंढरपूर, मंगळवेढा, आणि मोहोळ यात तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. (Latest Marathi News)

Drought In Solapur
PM मोदी यंदाही भारतीय जवानांसोबत साजरी करणार दिवाळी; जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये होणार सेलिब्रेशन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com