
महाराष्ट्रात अवघ्या 6 महिन्यात 40 लाख 81 हजार मतांची वाढ झाली...तर ही व्होटचोरी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.. त्यामुळे व्होटचोरीच्या चर्चांनी जोर धरलाय... त्यातच आता विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या 7 महिन्यात राज्यात 14 लाख 71 हजार मतदारांची वाढ तर 4 लाख मतदार वगळण्यात आल्याची माहिती समोर आलीय...मात्र कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वाढ झालीय? पाहूयात..
ठाणे 2,71,666 वाढलेत तर 45,800 मतदार वगळले आहेत.. पुणे जिल्ह्यात 2,26,451 मतदार वाढलेत तर 43,961 मतदार वगळण्यात आलेत..पालघर जिल्ह्यात 1,08116 मतदारांची वाढ तर 11,016 नावं वगळण्यात आलेत.. मुंबई शहरात 33,201 नावं वाढले आहेत तर 14,460 मतदारांची नावं वगळण्यात आलेत...मुंबई उपनगरात 1,39,802 मतदार वाढले असून 44,172 मतदार वगळले आहेत..
खरंतर सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिलेत...त्यामुळे आयोगाकडून निवडणूकीच्या तयारीला वेग आलाय.. दरम्यान आयोगाने वाढलेल्या आणि वगळलेल्या मतदारांची आकडेवारी जाहीर केलीय.... मात्र राज्यात तब्बल 4 लाख मतदार वगळण्यामागची कारणं काय आहेत? पाहूयात...
मतदाराचा मृत्यू, नोकरी, व्यवसायानिमित्त केलेल्या स्थलांतरामुळे नावं वगळण्यात आलेत...घर बदलल्याने नावं वगळण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय..
खरंतर 1 जुलैपर्यंतची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अंतिम मानली जातेय...राज्यात 8 कोटी 81 लाख मतदार आहेत... त्यात त्यानुसार डिसेंबर 2024 ते जुलै 2025 दरम्यान 14 लाख 71 हजार मतांची वाढ झालीय.. ही वाढ सामान्य असल्याचंही म्हटलं जातंय.
त्यामुळे विधानसभेनंतरच्या 7 महिन्यांत फक्त 14 लाख 71 हजार तर लोकसभेनंतरच्या 6 महिन्यांत 40 लाख मतं वाढले होते.. या आकडेवारीत दिसत असलेल्या मोठ्या फरकामुळे विरोधक आयोगाची कोंडी करण्याचीच शक्यता अधिक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.