महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केलं जाते. यंदा काेविड १९ च्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलली होती.
सातारा : राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणा-या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या scholarship exam तारखेत परिषदेने पुन्हा एकदा बदल केला आहे. आता ही परीक्षा येत्या 12 ऑगस्टला घेण्यात येईल scholarship exam date decleared असे परिषदेने कळविले आहे. चाैथ्यांदा या परीक्षेच्या तारखेत बदल झालेला आहे.
काेविड १९ च्या प्रादुर्भावामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत वारंवार बदल केला जात आहे. यापुर्वी ही परीक्षा २५ एप्रिलला घेण्यात येणार हाेती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनूसार राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलली. त्यानंतर ही परीक्षा २३ मे दरम्यान निश्चित करण्यात आली. त्यावेळी काेविड १९ ची दुसरी लाट राज्यात आली. परिणामी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर झाला.
दाेन महिन्यांच्या कालावधीनंतर शिष्यवृत्ती परीक्षा आठ ऑगस्टला निश्चित करण्यात आली. शालेय शिक्षण विभागाने त्याबाबत संमती दिली. परंतु याचदिवशी केंद्रीय पोलिस दलाची परीक्षा असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख पुन्हा नऊ ऑगस्ट करण्यात आली. परंतु त्या तारखेत देखील बदल करण्यात आला आहे. त्याचे कारणही राज्य परिक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात हाेत असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणा-या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांनी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे आता ही परीक्षा १२ ऑगस्टला घेण्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य परीक्षा परिषदेने संकेतस्थळावरही नवीन बदलाचा संदेश नमूद केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.