Women safety : महिलांच्या सुरक्षेसाठी सातारा पोलिसांची भन्नाट आयडिया! जाणून घ्या, काय आहे "अभया" उपक्रम? VIDEO

Satara Police Abhaya Mission : राज्यात सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस एक विशेष उपक्रम राबवत आहेत.
महिलांच्या सुरक्षेसाठी सातारा पोलिसांची भन्नाट आयडिया
Women safetySaam Tv
Published On

मुंबई : महिलांवरील अत्याचाराच्या घटनामुळे राज्यात संतापाचे वातावरण आहे. बदलापूर, अकोला, मुंबई असो अथवा चंद्रपूर, सातारा, कोल्हापूर सर्वच शहरातून महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. वाढत्या अत्याचाराच्या घटनामुळे महिला-मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. सातारा पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल उचलत अभया नावाचा विशेष उपक्रम चालवलाय. नेमका हा उपक्रम काय आहे, याबाबत आपण सविस्तर जाणून घेवू या.

सातारा पोलिसांची भन्नाट आयडिया

महिलांच्या सुरक्षेसाठी सातारा पोलिसांची एक भन्नाट आयडिया समोर (Maharashtra Police) आलीय. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक आयपीएस समीर शेख यांच्या संकल्पनेमधून एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. याचं नाव सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प "अभया" अभिनव उपक्रम असं आहे. नेमकं या उपक्रमात काय आहे, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला आहे का?

'अभया'चा उद्देश काय?

राज्यात सध्या गुन्हेगारांना कायदा व्यवस्थेची भिती शिल्लक नसल्याचं दिसत आहे, त्यामुळेच सातारा पोलीस अलर्ट मोडमध्ये आलेय. गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी एक विशेष पाऊल उचललं आहे. सातारा पोलिसांचा 'अभया' हा महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणारा विशेष उपक्रम आहे. या महिला सुरक्षा प्रकल्पाचा उद्देश आपण जाणून घेवू या. सातारा जिल्ह्यामध्ये होणाऱ्या महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध (Satara Police) करणे. महिला अत्याचार विरोधी कायद्यांची जनजागृती करणे आणि त्याची जरब बसवणे. प्रत्येक वयोगटातील मुली आणि महिला यांचा पोलिसांप्रती विश्वास वाढविणं.

महिलांच्या सुरक्षेसाठी सातारा पोलिसांची भन्नाट आयडिया
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मुलाच्या कुटुंबाकडूनच मुलीशी वडिलांना मारहाण

काय आहे "अभया" उपक्रम ?

अभया उपक्रमांतर्गत महिलांना पोलिसांची अत्यंत कमी कालावधीमध्ये मदत मिळणार (Abhaya Mission For Women safety) आहे. रिक्षामधून प्रवास करत असताना महिलांना थोडं जरी असुरक्षित वाटलं, तरी त्या पोलिसांची मदत घेवू शकतात. यासाठी सातारा पोलिसांनी एक विशेष अॅप तयार केलंय. यामध्ये त्यांनी एक क्युआर कोड तयार केलाय. महिलांना जेव्हा गरज वाटेल, तेव्हा त्या हा कोड स्कॅन करून आपलं लाईव्ह लोकेशन पोलिसांना पाठवू शकतात. जेणेकरून पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचून या महिलांची मदत करता येणार आहे. यामुळे महिलांवरील अत्याचाराला आळा बसेल. गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी वचक निर्माण होईल, असा विश्वास सातारा पोलिसांनी व्यक्त केलाय.

या प्रकल्पासाठी जिल्ह्यात नऊ हजार रिक्षा कार्यान्वित होणार आहे. त्यापैंकी २ हजार रिक्षा पहिल्या टप्प्यात सुरू होतील. प्रत्येक रिक्षेमध्ये क्यू आर कोड असणं बंधनकारक आहे. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर लोकेशन थेट पोलीस स्टेशनला जाणार (Women safety) आहे. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जातोय.

महिलांच्या सुरक्षेसाठी सातारा पोलिसांची भन्नाट आयडिया
Akola News: संतापजनक! बदलापूरनंतर अकोल्यात १२ वर्षीय मुलीचा विनयभंग, पोलिसांकडून वृद्ध व्यक्तीला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com