Dogs Attack : दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात घुसले, झोपलेल्या महिलेचे लचके तोडले; सांगलीत मोकाट कुत्र्यांचा कहर

Sangali Street Dogs : सांगलीच्या संजयनगर परिसरात सविता कोळेकर या महिलेला मोकाट कुत्र्यांनी घरात घुसून जबरदस्त चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
Sangali News : दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात घुसले, झोपलेल्या महिलेचे लचके तोडले; सांगलीत मोकाट कुत्र्यांचा कहर
Sangali NewsSaam Tv
Published On
Summary
  • संजयनगरमध्ये चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी घरात घुसून सविता कोळेकर यांच्यावर हल्ला केला.

  • महिलेला गंभीर जखमी अवस्थेत वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  • परिसरातील नागरिकांत भीतीचं वातावरण असून महापालिकेच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  • सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेला कठोर चेतावणी दिली असून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सांगली शहराच्या संजयनगर भागात सोमवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे. स्फूर्ती सोसायटीमध्ये राहणाऱ्या सविता कोळेकर या ४५ वर्षीय महिलेला चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी थेट घरात घुसून चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

सविता कोळेकर दुपारच्या सुमारास वामकुक्षी घेत असताना ही घटना घडली. घराचा दरवाजा उघडा असल्याने कुत्रे आत घुसले आणि त्यांनी त्यांच्या हातावर, पायावर व शरीराच्या इतर भागांवर जबरदस्त चावा घेतला. त्यानंतर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Sangali News : दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात घुसले, झोपलेल्या महिलेचे लचके तोडले; सांगलीत मोकाट कुत्र्यांचा कहर
Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

या घटनेनंतर परिसरात नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. संजयनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास काही नवीन नाही. याआधीही अनेक लहान मुलांवर आणि महिलांवर अशाच प्रकारे हल्ले झाले आहेत. मात्र, महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Sangali News : दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात घुसले, झोपलेल्या महिलेचे लचके तोडले; सांगलीत मोकाट कुत्र्यांचा कहर
Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, “महापालिकेने जर तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही, तर आम्ही हे कुत्रे थेट महापालिका आयुक्तांच्या दालनात सोडू.” त्यांच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, लवकरच कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Sangali News : दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात घुसले, झोपलेल्या महिलेचे लचके तोडले; सांगलीत मोकाट कुत्र्यांचा कहर
Sanjay Raut on Sangali Lok Sabha | आम्हालाही त्रास झाला, सांगली जागेवरून राऊतांचे मोठे विधान |

दरम्यान, या प्रकारामुळे संजयनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालिकेच्या दुर्लक्षामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न अधिकच गंभीर होत चालला आहे. सध्या सविता कोळेकर यांची प्रकृती चिंताजनक नसली तरी त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. स्थानिकांनी महापालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

Q

सांगलीतील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याची घटना कुठे घडली?

A

ही घटना संजयनगरमधील स्फूर्ती सोसायटीमध्ये घडली.

Q

कोण महिला या हल्ल्यात जखमी झाल्या?

A

सविता कोळेकर या ४५ वर्षीय महिला मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या.

Q

हल्ल्यावेळी त्या काय करत होत्या?

A

त्या झोपलेले असताना घराचा दरवाजा उघडा असल्याने कुत्रे आत घुसले.

Q

स्थानिक नागरिकांची या घटनेनंतर काय प्रतिक्रिया होती?

A

नागरिकांनी महापालिकेच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला असून तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com