

संजय जाधव, प्रतिनिधी...
Buldhana Rain Update: शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने नदी नाल्यांना प्रचंड पूर आला. तालुक्यातील असंख्य गावातील नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी सुरक्षेसाठी आश्रय घेतला आहे. (Maharashtra Rain Updates)
याबाबत अधिक माहिती अशी बुलढाण्याच्या (Buldhana) संग्रामपूर (Sangrampur) तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. तालुक्यातील कातरगाव पिंप्री गावात पुराचे पाणी शिरले आहे. गावाला चारही बाजूने वेढा दिल्याने गावातील जवळपास १२० नागरिक अडकून पडले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन पथक या गावात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच लवकरच त्यांना सुरक्षित रित्या बाहेर काढले जाणार आहे. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी दिली आहे.
यवतमाळमध्येही पावसाचा हाहाकार...
यवतमाळ जिल्ह्याच्या ( Flood In Yavatmal) विविध भागाला शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले. जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला असून अवघ्या २४ तासात यवतमाळ तालुक्यात २३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महागांव (Mahagaon Flood) तालुक्यातील आनंद नगर इथे पुरात चाळीस जण अडकून पडले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.