Gangapur Dam Water Storage: मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Maharashtra Rain Update) जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.
नाशिक शहर परिसरात अद्याप जोरदार पाऊस कोसळला नाही, मात्र त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगाधर धरणाच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. (Maharashtra Weather Update)
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने नाशिकच्या (Nashik) गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam Storage) पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या गंगापूर धरणात ८२ टक्के इतका पाणीसाठी जमा झाला आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणाच्या पाणीसाठ्यात यंदा १२ टक्क्यांनी वाढ झाली.
त्याचबरोबर गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा एकूण पाणीसाठी ६७ टक्क्यांवर आला आहे. विशेष बाब म्हणजे यंदा १५ ऑगस्टपर्यंत गंगापूर धरणात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. आगामी काळात पावसाची शक्यता कमी असल्याने ९० टक्के पाणीसाठा ठेवता येणार आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी असताना गंगापूर धरणात झालेली वाढ शेतकऱ्यांना तसेच नाशिककरांनाही दिलासा देणारी आहे. सध्या धरणात ८२ टक्के पाणीसाठा असल्याने तूर्तास धरणातून पाण्याचा विसर्ग होणार नाही मात्र आगामी काळात जोरदार पाऊस झाल्यास विसर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.