Maharashtra Rain Update: आज देशात सर्वाधिक पाऊस कोकणातील दापोलीत; पुढील २४ तासांत कुठे कोसळणार?

Maharashtra Rain Update: गेल्या २४ तासांत कोकणातील दापोलीत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
Heavy Rain rain Vidarbha Marathwada And many District in Maharashtra
Heavy Rain rain Vidarbha Marathwada And many District in MaharashtraSaam TV
Published On

Maharashtra Rain Update:

राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली होती. पावसाअभावी शेतकऱ्यांवर मोठं संकंट आलं होतं. मात्र, गेल्या २४ तासांत मुसळधार पावासामुळे राज्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत कोकणातील दापोलीत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दापोलीत गेल्या २४ तासांत २५ सेमी पाऊस बरसला आहे. (Latest Marathi News)

राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार धरला आहे. राज्यातील विविध भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या ४८ तासांत पावसाचा आणखी जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे .

Heavy Rain rain Vidarbha Marathwada And many District in Maharashtra
Nashik Rain News | नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली, गंगापूर धरण 95 टक्के भरलं!

आजही राज्यातील विविध भागात पावसाचा जोर दिसला. गेल्या २४ देशभरात अति मुसळधार पावसाची नोंद झाली. आज देशात कोकणातील दापोलीत सर्वाधिक २५ सेमी पावसाची नोंद झाली आहे. तर नाशिकच्या त्रंब्यकेश्वरमध्ये १५ सेमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांसाठी मुंबईत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत उद्या वादळी वारे आणि गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदूर्ग जिल्हांना 'येलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Heavy Rain rain Vidarbha Marathwada And many District in Maharashtra
Maharashtra Rain Update: राज्यात येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा! पुढील २ दिवसांत कुठे-कुठे कोसळणार मुसळधार?

पुणे हवामान केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी देखील राज्यात पुढील २,३ आठवडे पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. होसाळीकर यांनी माहिती दिली आहे की, 'आयएमडी मॉडेल मार्गदर्शनानुसार, पुढील २,३ आठवडे महाराष्ट्राच्या काही भागांसह देशातील बहुतांश भागात मान्सूनची सक्रिय राहील. ऑगस्टमधील अत्यंत कमी पावसानंतर हा बहुप्रतिक्षित पाऊस. त्यामुळे पाण्याचे साठे आणि पिके सुधारतील'.

बीडमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही संततधार पाऊसाची हजेरी

बीड जिल्ह्यात दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसानं हजेरी लावली आहे. पावसाची गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

बीड, पाटोदा,वडवणी, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज गेवराई यासह अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अद्यापही बीड जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पासह नद्या देखील कोरड्या आहेत. यामुळे अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com