Rain Update: शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, नववर्षाला पाऊस हजेरी लावणार; राज्यात कुठे अन् कधी बरसणार? वाचा

maharashtra rain update : आता वर्षअखेर आणि नवीन वर्षांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३१ ते १ जानेवारी रोजी राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain UpdateSaam Tv
Published On

Maharashtra rain Update:

२०२३ वर्षाचा शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. या वर्षाच्या गेल्या काही महिन्यांत पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. गेल्या काही आठवड्यात महाराष्ट्रासहित देशातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता वर्षअखेर आणि नवीन वर्षांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३१ ते १ जानेवारी रोजी राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाने काय अंदाज दिलाय?

देशातील तामिळनाडूतील किनारपट्टीवर ३० डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासहित देशातील हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, राजस्थान, गोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पश्चिम राजस्थान, उत्तर पदेशमधील काही भाग आणि दिल्ली एनसीआरमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Rain Update
Mumbai Police: नववर्षाच्या सेलिब्रेशनवर मुंबई पोलिसांची करडी नजर, फटाक्यांबाबत जारी केले कडक आदेश; वाचा सविस्तर माहिती

पंजाबमध्ये दाट धुक्याची शक्यता

पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये २७ ते ३१ डिसेंबरदरम्यान सकाळच्या सुमारास दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हरियाणाचा काही भाग, चंडीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

स्कायमेट पावसाचा काय अंदाज दिलाय?

हवामान विभागाच्या खासगी संस्था स्कायमेटने पावसाबद्दल अंदाज दिला आहे. ३० ते १ जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नववर्षाचं स्वागत करणाऱ्या लोकांच्या आनंदावर पावसाचं विरजन पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update
Rabi Hangam : पावसाअभावी रब्बी हंगामात घट; ऊस लागवड क्षेत्रात मात्र वाढ

शेतकऱ्यांचं नुकसान होणार?

राज्यात अवकाळी पाऊस कोसळ्यास त्याचा फटका रब्बी पिकाला बसण्याची शक्यता आहे. यंदा कमी टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे बऱ्यात जिल्ह्यात रब्बी पिकात घट झाली आहे. तसेच थंडीही पडली नाही. त्याचा परिणाम रब्बी पिकावर होण्याची शक्यता आहे. या वातावरणामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com