Maharashtra Rain Update: राज्यात सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा परतणार; आता कधी, कुठे दिला पावसाचा अलर्ट

Maharashtra Rain Update in Marathi : हवामान विभागाने पाऊस केव्हा परतणार, याचा अंदाज वर्तविला आहे.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain UpdateSaamtv
Published On

Maharashtra Rain Update News In Marathi

राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील बऱ्याच भागातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. त्यामुळे पाऊस कधी येणार,याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, हवामान विभागाने पाऊस कधी परतणार, याचा अंदाज वर्तविला आहे. (Latest Marathi News)

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी पाऊस केव्हा परतणार याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

होसाळीकर यांनी ट्विट करत म्हणाले, 'सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या चार आठवड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या चार आठवड्यात पावसाचा अंदाज आहे. पहिल्या आठवड्याच्या मध्यात दक्षिण द्वीपकल्प, महाराष्‍ट्र (मराठवाडा), कोकण, गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारतात पावसाची शक्यता आहे. तसेच कर्नाटकातही पावसाची शक्यता आहे'.

Maharashtra Rain Update
Devendra Fadnavis On India Meeting: मोदी आमचे PM पदाचे उमेदवार, तुमचे कोण?, फडणवीसांचा थेट हल्लाबोल

शेतकऱ्यांची चिंता वाढली

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात यंदा फार कमी पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update
Mallikarjun Kharge on PM Narendra Modi: 'खोटं बोला पण रेटून बोला...'; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा PM मोदींवर हल्लाबोल

विदर्भातील शेतकरी चिंतेत

विदर्भात प्रामुख्याने खरिपात सोयाबीन आणि कपाशीचं मोठ उत्पादन घेतलं जातं. मात्र, सध्या पावसाने दडी मारल्याने सोयाबीनची पाने पिवळी होताना दिसत आहेत. यामुळे सोयाबीनवर 'यलो मोझाक रोगाचा प्रादुर्भाव आहे.

अमरावती जिल्ह्यात गेल्या 12 दिवसांपासून नसल्याने अनेक भागात सोयाबीन पिकाने माना टाकलेल्या दिसत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढलेली दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com