Maharashtra Rain Live Updates: पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत

Today's Maharashtra Rain News & Updates (24 July): राज्यात आज देखील पावसाचा जोर कायम राहणार; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
Vasai News
Vasai NewsSaam Tv
Published On: 

पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत

पुण्यावरून मुंबईकडे जाणारी एक लने सुरु करण्यात आली आहे. अडोशी बोगद्यातील काम साडेतीन तासानंतर बंद करण्यात आले आहे.

वसई मधिल रानगाव खाडीत पडली चारचाकी

वसई पश्चिमेला असलेल्या रानगावच्या खाडीत एक चार चाकी पडली असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी चालक मध्यरात्री उशिरा पर्यंत गाडीतच मद्यपान करून गाडीतच झोपून गेला होता. सकाळी चालकाने गाडी चालू करताच अधिक नशे मुळे त्याचा गाडीवरचा ताबा सुटला व थेट रानगाव खाडी मध्ये चारचाकी घेऊन पडला. या अपघात गाडी चालक सुखरूप असून त्याला कोरकोल जखमी झालेल्या आहेत,परंतु चारचाकी चे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या क्रेनच्या मदतीने चारचाकी बाहेर काढण्यात आली आहे

येवतेश्वर घाटातील धोकादायक दगड हटवण्याचे काम सुरु

येवतेश्वर घाटातील धोकादायक दगड हटवण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. जेसीबीच्या सहाय्याने डोंगरातील निसटलेले दगड खाली ढकलून देण्यात आले आहेत. हे मोठमोठे दगड रस्त्यावर आले असून काही वेळात हे दगड बाजूला केले जाणार आहेत.हे डोंगरातील दगड रस्त्यावर आल्याने या घाटातील रस्त्याचे आणि संरक्षक भिंतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र डोंगरातील हे धोकादायक दगड हटवल्याने लोकांना आत्ता या रस्त्याने सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

Maharashtra Rain Live Updates: कोयना धरणातून होणार 1050 क्यूसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मागील तीन ते चार दिवसांपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. कोयना-150 मिलिमीटर नवजा-201 मिलिमीटर महाबळेश्वर-185 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.

त्यामुळे धरणात 51.93 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. धरणामध्ये 59851 क्युसेक्सने पाण्याची आवक होत असल्याने कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून दुपारी 4 वाजता 1050 क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारा एक रस्ता बंद

कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारा एक रस्ता बंद

कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंद

पूल जुना असून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पूल वाहतुकीसाठी बंद

दुर्घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निर्णय

नाशिक शहरात संततधार पावसाला सुरूवात

नाशिक शहरात संततधार पावसाला सुरूवात झाली असून अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. मात्र अद्यापही नाशिक शहरासह जिल्ह्यातील मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गंगापूर धरण ५३ टक्के भरलं असून दारणा धरण ७८ टक्के भरलं आहे. पुढील ४ ते ५ दिवस नाशिक जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Latur News: लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरण क्षेत्रात अत्यल्प पाऊस...

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरण प्रकल्प क्षेत्रात आता पर्यंत कमी पाऊस झाला आहे. यावर्षी 216 मि.मी पाऊस पडला आहे. नव्याने 7.27 द.ल.घ.मी. पाणीसाठा वाडला आहे. धरण क्षेत्रात 40.897 दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. 23.11% पाणीसाठा उपलब्ध आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दुपारी 'या' वेळेत दोन तास बंद

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहाटे अडीचपर्यंत दरड हटविण्यात आली होती. त्यानंतर दोन लेन सुरू करण्यात आल्या होत्या. तर एक लेन अजुनही बंद आहे. मात्र आता दुपारी दोन तास मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

पुण्यात आम आदमी पक्षाने केलं "सेल्फी विथ खड्डा" आंदोलन

पुण्यात आम आदमी पक्षाने केलं "सेल्फी विथ खड्डा" आंदोलन केले. धानोरी भागात पोरवाल रोड या ठिकाणी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी खड्डा पडलेल्या ठिकाणी झाडं लावत "सेल्फी विथ खड्डा" असा फलक घेत आंदोलन केलं. सर्व सामान्य जनतेकडून १५० कोटी रुपये सरकारला देत असूनही या धानोरी पोरवाल रोड भागामध्ये कोणत्याही सोयी सुविधा देण्यात येत नाहीत असा आरोप आपने यावेळेस केला आहे. धानोरी भागात पावसामुळे मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरड कोसळल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक धीम्या गतीने

रविवारी रात्री पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर आडोशी गावच्या हद्दीत मुंबई लाईनवर डोंगर भागातून दरड कोसळली होती. मातीचा मलबा मुंबई बाजू कडील तिन्ही लेन वर पडलेल्याने वाहतुक बंद झाली होती. सदरचा मातीचा मलबा बाजुला करून मध्यरात्री आडीच वाजण्याच्या सुमारास दोन लेन वरून वाहतुक सुरु करण्यात आली आहे. तिसऱ्या आणि शोल्डर लेनवर दरडीचा हा मलबा बाजूला काढून ठेवण्यात आला आहे. या दरड दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. आत्ता वाहतुक सुरु असली तरी वाहतुक संथ गतीने सुरु आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पडलेली दरड हटवण्याचे काम पूर्ण; वाहतुक सुरु

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्याची घटना काल (२३ जुलै) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. अखेर आता मुंबई पुणे एक्सप्रेसवर पडलेली दरड हटवण्याचे काम पुर्ण झाले असून वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.

Raigad Rain Update: रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर

रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज (२४ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी तसे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Yavatmal Rain News: यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे 1 हजार 472 घरांचे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी पाऊस कोसळल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती. बचाव कार्य करताना प्रशासनाची ही तारांबळ उडाली एकाच वेळी अनेक ठिकाणी मदत पोहोचवताना कसरत करावी लागली.आता सर्वत्र पूर ओसरला असून नुकसानीचे भयानक दृश्य पुढे येऊ लागली आहे. पावसामुळे प्राथमिक सर्वेक्षणात एक हजार 442 घरांचे नुकसान झाले तर 275 घरे पूर्ण जमीन दोस्त झाली 14 गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार 72 हजार 737 हेक्टररील पीक पूर्ण खरडून गेली आहे. प्रत्यक्ष सर्वे केल्यानंतर हा आकडा कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वारणा नदीकाठच्या शेतकरी आणि नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा..

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण व वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे वारणा नदी पात्राच्या बाहेर पडली आहे. त्यामुळे शेतामध्ये पाणी शिरले आहे. तर शिराळा तालुक्यातील मांगले सावर्डे वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी; प्रशासन अलर्ट मोडवर

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीला मोठा पूर आला असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 39 फुट 03 इंचावर गेली असून नदीच्या धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि यंत्रणा अलर्ट झाल्या असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.